-
केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाची त्याच्या होणाऱ्या पत्नीने म्हणजे सिया गोयलने लोहगडावरुन धक्का देऊन हत्या केली. या घटनेने पुणे जिल्हा आणि राज्यही हादरलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस आणि सोशल मीडिया)
-
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचे जुने व्हिडीओही व्हायरल होत आहेत. तसंच या प्रकरणात आता विविध प्रकारची माहितीही समोर येते आहे.
-
केतन अग्रवालची हत्या हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. सियाने बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या मदतीने हा कट आखला. तिने तीन वेळा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता अशीही माहिती आता समोर आली आहे.
-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सियाने १८ जूनच्या आधी तीन वेळा केतनला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. ३१ मे रोजी लोहगडावर जायचं आणि केतनला ढकलायचं असं सियाने ठरवलं होतं. मात्र हा प्लान कॅन्सल झाला.
-
त्यानंतर ४ जून रोजीही असंच घडलं आणि केतन आणि सिया लोहगडावर जाऊ शकले नाहीत. १४ जूनला हट्ट धरुन सियाने केतनला लोहगडावर नेलं. तिथे त्याला धक्काही दिला पण तो झुडुपांमध्ये अडकला. त्यावेळी साप आला असं ओरडत सिया केतनच्या जवळ गेली आणि त्याला मिठी मारली.
-
सियाचे तीन प्रयत्न फसले पण चौथा प्रयत्न म्हणजेच १८ जूनचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला. केतन सेल्फी घेताना पडल्याचा बनाव तिने रचला होता. पण नंतर हा पूर्वनियोजित कट होता ही बाब समोर आली.
-
केतनचा मृत्यू झाल्यानंतर सियाचं वागणं केतनच्या घरातल्यांना संशयास्पद वाटलं. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. ज्यानंतर चेतन चौधरीही लोहगडावर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या दोघांना अटक करण्यात आली.
-
केतनला धक्का देऊन ठार मारल्यानंतर सिया गोयल शांत होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ जूनला तिचा वाढदिवस होता त्यादिवशी तिने दोघांचा एक व्हिडीओ आणि केतन परत ये ना म्हणून पोस्टही केली.
-
आपल्यावर कुणीही संशय घेऊ नये म्हणून सिया गोयलने ही पोस्ट लिहिली होती. पण या प्रकरणाला वाचा फुटलीच, तसंच वास्तवही लपून राहिलं नाही.
-
सिया आणि केतन यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात पार पडला होता. त्यांचं लग्नही थाटात पार पडणार होतं. पण सियाला केतन पसंतच नव्हता. त्यामुळे तिने त्याचा प्रियकराच्या साथीने काटा काढला.
-
आता या प्रकरणातले विविध पैलू समोर येत आहेत. सिया आणि चेतन यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी केतनच्या आईने केली आहे.
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा