-
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांनी नुकतीच श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे विधीवत पूजन केले व आशीर्वाद घेतले.
-
याप्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी माऊलींच्या चरणी प्रार्थना केली.
-
दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’च्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कामकाजाचा आढावा घेतला.
-
संस्थानतर्फे मांडण्यात आलेल्या विकासकामांच्या मागण्या, भाविकांसाठीच्या सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून यावर योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
-
“श्रीक्षेत्र आळंदी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी अधिक दर्जेदार व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-
या दौऱ्यादरम्यान आळंदी येथील ‘इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट’मध्ये अत्याधुनिक PET-CT Scan मशीनचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
-
ग्रामीण व निमशहरी भागातील कर्करोग (कॅन्सर) निदान आणि उपचार क्षेत्रात यामुळे एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
-
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत “जो जे वांछील तो ते लाहो” या पसायदानाचा संदेश आज या आरोग्य सुविधेच्या रूपाने प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुनेत्रा अजित पवार/इन्स्टाग्राम)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”