-
लोहगडावरून धक्का देऊन केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्य हादरून गेले आहे.
-
या संपूर्ण हत्याकांडाचा कट केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या साथीने रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
-
केतनला कायमचे संपवण्यासाठी सियाने यापूर्वी तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने ठार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, अशीही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
-
गेल्या फेब्रुवारी महिन्यातच सिया आणि केतन यांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता आणि लवकरच त्यांचे लग्नही ठरले होते.
-
वास्तविक पाहता सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते आणि तो तिला अजिबात पसंत नसल्याने तिने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचे क्रूर पाऊल उचलले.
-
केतनचा मृत्यू झाल्यानंतर सियाच्या बदललेल्या संशयास्पद वर्तनामुळे अग्रवाल कुटुंबाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले.
-
त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चेतन चौधरी देखील लोहगडावर उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले, ज्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करत या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
-
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी केतनच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
-
केतनच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची आणि सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती, जी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य करून कृती केल्याबद्दल वडिलांनी त्यांचे आभार मानले आहेत.
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”