-
ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. (फोटो – X/ Sachin Ahir)
-
सहा खासदारांच्या फुटीनंतर सचिन अहिर यांच्या रुपाने ठाकरेंसाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. वरळी मतदारसंघात अहिर यांनी पक्ष मजबूतीसाठी मोठं काम केलं आहे. (फोटो – X/ Sachin Ahir)
-
सचिन अहिर यांनी जुलै २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत पक्षात प्रवेश केला होता. २०२२ मध्ये ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर आले होते. (फोटो – X/ Sachin Ahir)
-
अहिर आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते मानले जातात, वरळीत त्यांनी आदित्य आणि पक्षासाठी ग्राऊंड लेव्हलवर काम केल्याचे सांगितले जाते. (फोटो – X/ Sachin Ahir)
-
सचिन अहिर १९९९ ते २०१९ या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांबरोबर होते. त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. (फोटो – X/ Sachin Ahir)
-
अहिर १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. २००९ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केले आहे. (फोटो – X/ Sachin Ahir)
-
२०१९ मध्ये अहिर यांनी शरद पवारांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. २०२० मध्ये अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्त करण्यात आली. (फोटो – X/ Sachin Ahir)
-
याशिवाय वेगळी ओळख म्हणजे सचिन अहिर अरुण गवळी (डॅडी) यांचे भाचे आहेत. अरुण गवळींची बहीण आशालता यांचे सचिन अहिर पुत्र आहेत. (फोटो – X/ Sachin Ahir)
-
अहिर यांनी आता ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जता आहे. (फोटो – X/ Sachin Ahir)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ