-
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण आणि देशातील वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.
-
आज म्हणजेच २० जुलै २०२६ पासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून, सीजेपीने ‘चला संसद’ मोर्चाची घोषणा केली आहे.
-
या मोर्चात सहभागी होण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे हजारो समर्थक जंतर-मंतर येथे दाखल झाले आणि त्यांनी संसदेच्या दिशेने कूच केले.
-
दिल्लीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत प्रचंड गदारोळ झाला आहे.
-
कॉकरोच जनता पार्टीचा संसद मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत.
-
संसदेच्या दिशेने जाणाऱ्या या नियोजित मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांची संख्या आता १२ हजारांहून अधिक झाली आहे.
-
जंतर-मंतरजवळ सीजेपीच्या समर्थकांनी निषेध मोर्चा काढण्यापूर्वी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
-
आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस आणि आरएएफच्या जवानांना लाठीमार करावा लागला.
-
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोमवारी जंतर-मंतर येथे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून आपले उपोषण मागे घेतले.
-
आंदोलन तीव्र होताच संसद मार्ग परिसरामध्ये हजारो निदर्शनकर्ते एकत्र आले आणि त्यांनी पटेल चौक भागाकडे धाव घेतली.
-
आंदोलकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पटेल चौक मेट्रो स्थानकाचे दरवाजे बंद केले आहेत.
-
या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी आणि त्यांचे पालक १९ जुलैच्या सायंकाळापासूनच जंतर-मंतरवर जमा होऊ लागले होते. (सर्व फोटो सौजन्य :PTI)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा