-
नीट पेपरफुटीवरून गेल्या महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली केली आहे. (फोटो – X/Cockroach Is Back)
-
शिक्षण सचिव विनीत जोशी यांना पदावरून हटविण्यात आले आहे. (फोटो – X/ Vineet Joshi)
-
जोशी यांची पंचायत राज मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. (फोटो – X/ Vineet Joshi)
-
जोशी यांच्याजागी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (X/ Naresh Gangwar)
-
विनीत जोशी हे मणिपूर केडरचे १९९२-बॅचचे अधिकारी असून जानेवारी २०२५ पासून उच्च शिक्षण विभागात सचिव म्हणून कार्यरत होते. (फोटो – X/ Vineet Joshi)
-
नीट पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पार्टी आणि विरोधी पक्षांकडून सुरु असणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. (फोटो – X/Cockroach Is Back)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीट पेपरफुटीप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. (फोटो – X/ PMO)
-
दरम्यान, आंदोलकांकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. (फोटो – X/ Dharmendra Pradhan)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ