-
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन केले होते.
-
याच मुद्द्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते.
-
सोनम वांगचुक यांना १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी बळजबरीने जंतर-मंतरवरून उचलले होते, तेव्हा अभिजित दिपके भावूक होऊन जंतर-मंतरवर रडले होते.
-
सोनम वांगचुक यांना उचलून नेल्यावर अभिजीत यांच्या डोळ्यांत पाणी का आले होते, यावर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी भाष्य केले.
-
यावर अभिजीत म्हणाले, “सोनम सरांना जेव्हा उचलून नेण्यात आलं, तेव्हा मी रोज जंतर-मंतरवरच झोपायचो. सोनम सरांबरोबर सकाळी ६-६:३० वाजता आम्ही उठायचो, चर्चा करायचो. ७ वाजता मी निघून जायचो तिथून.”
-
“माझ्या मित्राच्या घरी अंघोळ करायला गेलो, तेवढ्यात मला फोन आला की सोनम सरांना उचलून नेण्यात आले आहे. मी निघायचा प्रयत्न केला.”
-
दिल्ली पोलिसांबाबत ते म्हणाले, “दिल्ली पोलिसांना मारायला खूप आवडतं. बाकी काही असो वा नसो, पण त्यांना मारायला खूप आवडतं. पाच-सहा पोलिसांनी मला तिथेच पकडलं, मला मारलं. मला रस्त्यावर घासून असं त्यांनी खाली दाबून ठेवलं, जोपर्यंत सोनम सरांना ते उचलून नेत नाहीत तोपर्यंत.”
-
पुढे भावूक होऊन ते म्हणाले, “त्यावेळी मला असं झालं की, आज मी इथून गेला नसतो तर सोनम सरांना उचलण्यात नसतं आलं. तर ते माझ्या आत एक गिल्ट होतं. मला असं वाटलं की माझ्या चुकीमुळे सोनम सरांना उचलून नेण्यात आलं.”
-
(फोटो सौजन्य : ANI)
आई गं, काय नाचल्या…. ‘कोयल से तेरी बोली’ गाण्यावर पोरींचा धिंगाणा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक