-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाईफ, माय स्ट्रगल्स’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली.
-
या सोहळ्यात बोलताना मोदी म्हणाले की, “दृढनिश्चयाच्या जोरावर एखादी व्यक्ती संकटांवर मात करून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत कशी पोहोचू शकते, हे कोविंद यांच्या जीवनप्रवासाने दाखवून दिले आहे.”
-
राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही कोविंद यांनी आपले सार्वजनिक कार्य सुरू ठेवल्याचे सांगत पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की, पद सोडल्यानंतरही ते शांत बसले नाहीत, तर ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या महत्त्वाच्या उपक्रमावर काम करत आहेत; ज्यामुळे “भारतीय लोकशाहीत एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो.”
-
माजी राष्ट्रपतींचे या विषयावरील प्रयत्न हे भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठीच्या त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाचाच एक भाग असल्याचे मोदींनी नमूद केले.
-
या वेळी पंतप्रधानांनी तरुणांना आत्मचरित्रे वाचण्याचे आवाहन केले. कारण, आत्मचरित्रामुळे एखादा विशिष्ट काळ प्रत्यक्ष अनुभवलेल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो काळ समजून घेण्याची संधी मिळते.
-
सरकार आणि भाजप सोशल मीडियावर ‘जनरेशन झेड’ (Gen Z) शी संवाद साधण्याचे प्रयत्न तीव्र करत असतानाच मोदींचे हे विधान समोर आले आहे.
-
पंतप्रधान पुढे म्हणाले की, कोविंद यांचे आत्मचरित्र म्हणजे “भारतीय लोकशाहीचा मोलाचा वारसा” ठरेल आणि नव्या पिढीला त्यातून खूप काही शिकायला मिळेल.
-
कोविंद यांच्या बालपणीच्या एका प्रसंगाची आठवण सांगताना मोदी म्हणाले की, लहानपणी घरातील सामान वाचवण्याच्या प्रयत्नात लागलेल्या आगीत कोविंद यांनी आपल्या आईला गमावले होते. ही दुःखद घटना कोणालाही खचवून टाकणारी होती, मात्र या घटनेने कोविंद यांना खचवण्याऐवजी अधिक कणखर बनवले.
-
या प्रसंगी बोलताना कोविंद म्हणाले की, त्यांनी भाजपशी नाते जोडले, कारण त्यांच्या मते हा पक्ष घराणेशाही किंवा जातीयवादापेक्षा ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराला अधिक महत्त्व देतो.
आतड्यांमध्ये कुजलेला मल झटक्यात पडेल बाहेर! फक्त माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ४ सोपे उपाय करा; पोट होईल पूर्ण साफ!