-

आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था (आयटीआय) ही संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक संघटनेची (युनेस्को) भागीदार असलेली स्वयंसेवी संस्था. या संस्थेने १९८२ पासून २९ एप्रिल हा दर वर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले. (एक्स्प्रेस फोटो)
-
बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (१७२७-१८१०) यांचा २९ एप्रिल हा जन्मदिन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. (एक्स्प्रेस फोटो)
-
जागतिक नृत्य दिनाच्या दिवशी संबंधित वर्षांतील सर्वोत्कृष्ट नर्तकाला जागतिक संदेश देण्यासाठी युनेस्कोमध्ये आमंत्रित केले जाते. (एक्स्प्रेस फोटो)
-
नृत्यकलेचा अधिकाधिक प्रसार व्हावा, तिला राजाश्रय मिळावा, नृत्य कलावंतांचे समाजातील स्थान उच्च व्हावे या उद्देशाने 'जागतिक नृत्य दिन ' साजरा केला जातो. (एक्स्प्रेस फोटो)
-
एखाद्या गाण्यावर ठेका धरला म्हणजे डान्स येतोच असं नाही . तर डान्ससाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. अलीकडे डान्स या छंदाकडे अनेकजण करीअर म्हणूनही पाहू लागले आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
-
नृत्य आणि मानवी संस्कृती यांचा फार पुरातन संबंध आहे. पुराणात डोकावले तर देवांचा राजा इंद्र याच्या दरबारातील रंभा-ऊर्वशी या उच्च कोटीच्या नर्तिका होत्या. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
-
-
मोठमोठय़ा 'कॉपरेरेट कंपन्यांमध्ये' आजकाल शारीरिक व्यायाम, तणावमुक्ततेसाठी (stress management), सांघिक भावना वाढवण्यासाठी (team building), तसेच कॉम्प्युटरवर बसून फार वेळ काम केल्याने होणाऱ्या शारीरिक त्रासांवर उपाय म्हणून, इत्यादी अनेक कारणांसाठी नृत्योपचाराचा वापर केला जातो. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
भारतात ताम्रपाषाण काळापासून म्हणजे सुमारे पाच सहस्र वर्षांपासून नृत्यमूर्ती उपलब्ध आहेत. 'हडप्पा येथील पाच नर्तकांचा शिरोहीन पुतळा व मोहेनजोदडो येथील नर्तिकेची धातूतील प्रतिमा' हे अतिप्राचीन काळातील नृत्यमूर्तीचे दाखले देतात. (एक्स्प्रेस फोटो)
-
विविध प्राचीन संदर्भ तसंच देवळांमधील शिल्पकला पाहिली तर नृत्य आणि शिल्पकला याचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे असं लक्षात येतं. या दोन्ही कला एकमेकींना पूरकच ठरल्या आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
-
नृत्य ही एक कला आहे. या कलेत पारंगत असलेल्यांना राजे-राजवाडय़ांत आश्रय दिला जायचा. या कलेचे संगोपन करणे, तिच्या वृद्धीची काळजी घेणे हा राजधर्म समजला जायचा. (एक्स्प्रेस फोटो)
-
नाटय़शास्त्रात नृत्याच्या शिल्पगत, शिल्पसदृश, अंङ्ग, प्रत्यंग, उपांगांचे सम्यक व विस्तृत विवेचन पाहायला मिळते.' या संदर्भावरून प्राचीन काळात सर्व कला शिल्पकलेच्या नावाखाली येत होत्या, हे स्पष्ट होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
भारतातील शास्त्रीय नृत्य प्रकार ज्या ज्या प्रदेशात उगमाला आले, तेथे शिल्पकलेतही त्याची छाप दिसून येते. (एक्स्प्रेस फोटो)
-
इतिहासात डोकावले तर राजे-महाराजांकडे खास उत्सवाच्या वेळी नाचगाण्याचे कार्यक्रम होत असत. (एक्स्प्रेस फोटो)
-
भरतनाटय़म, कथक, ओडिसी, मणिपुरी अशा शास्त्रीय नृत्यशैलीमधील साम्य असलेल्या मुद्रा, स्टेप्स यांचा फ्युजनमध्ये समर्पक वापर केला जातो. (एक्स्प्रेस फोटो) -
नृत्योपचाराच्या विविध क्रियांमध्ये मनातील विविध भावना, विचार जागृत होऊ शकतात. ज्या सहज बोलून दाखवता येऊ शकत नाही अशा भावना शरीराच्या साहाय्याने व्यक्त केल्या जाऊ शकतात. (एक्स्प्रेस फोटो)
-
विविध संस्कृतींचादेखील आगळावेगळा संगम नृत्याविष्कारातून घडतो असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही! (एक्स्प्रेस फोटो)
-
श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत केलेल्या रासलीला हा नृत्याचाच प्रकार होता. (एक्स्प्रेस फोटो)
-
महाभारत रणांगणावर युद्ध करून थकलेल्या योद्धय़ांच्या श्रमपरिहारानिमित्त नाचगाण्याचे कार्यक्रम आयोजिले जात. (एक्स्प्रेस फोटो)
-
नाचताना सुडौल आणि ढंगदारपणे उभं राहण्याची पद्धत नर्तकाला अवगत होते. पोट घट्ट करून, ताठ उभे राहून, पाय जुळवून केलेली मुद्रा 'कोअर' स्ट्राँग करते. पायाचे, कमरेचे आणि पोटाचे स्नायू पीळदार होतात. या शैलीची सतत प्रॅक्टिस केल्याने 'अॅब्स वर्कआउट'सुद्धा होत राहते. (एक्स्प्रेस फोटो)
-
नृत्यकलेमध्येसुद्धा अनेक प्रयोग केले जात आहेत आणि 'फ्युजन नृत्य' म्हणून ते ओळखले जात आहे व लोकप्रिय ठरत आहे. (एक्स्प्रेस फोटो)
नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या हेतूने विविध नृत्यशैलींचा मिलाप करून सादरीकरण केले गेले; ज्याला आज आपण 'फ्युजन नृत्य' म्हणून ओळखतो. (एक्स्प्रेस फोटो) -
-
-
-
-
-
-
-
-
जागतिक नृत्य दिन
नृत्यकलेचा प्रसार व प्रचार करण्याच्या हेतूने युनेस्कोच्या ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ डान्स’ या शाखेतर्फे दरवर्षी २९ एप्रिल हा ‘जागतिक नृत्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
Web Title: International dance day