-
नवीन प्रदेशाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्याकरिता मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. ( छाया- गणेश शिर्सेकर)
-
नेपाळमध्ये सध्या भूकंपग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असून मदतकार्य वेगाने सुरू आहे. नेपाळच्या लष्करी दलाचा जवान एका लहान मुलाला आणि त्याच्या आईला सुरक्षित स्थळी नेताना. (छाया- पीटीआय)
-
१ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे सुरक्षा दलाचे जवान संचलनाचा जोरदार सराव करताना. ( छाया- गणेश शिर्सेकर)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज दिनेश कार्तिक धावचीत होण्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करताना. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात युवा खेळाडू सर्फराज खानने चौकार-षटकारांची आतषबाजी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ७ बाद २०० धावांचा पल्ला गाठून दिला. मात्र, त्यानंतर पावसामुळे सामना अनिर्णित राहिला. (छाया- पीटीआय)
एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं; ‘या’ राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती, नोकरी, संपत्ती, आरोग्याची हानी