-
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी धामणगाव रेल्वे तालुक्यात भर उन्हात पदयात्रा करून शेतकरी कुटुंबांचे सांत्वन केले. (छाया पीटीआय)
-
कोणत्याही सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची असायला हवी, पण केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. (छाया: पीटीआय)
-
राहुल गांधी यांच्या या पदयात्रेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण सकाळपासून हजर होते. (छाया: पीटीआय)
-
शेतकऱ्यांचे दु:ख पाहून मनाला वेदना होत आहेत, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. (छाया: पीटीआय)
-
राहुल गांधी यांनी लहान-थोरांशी संवांद साधला. (छाया: पीटीआय)
-
सध्याचे सरकार हे निवडक भांडवलदारांचे सरकार आहे. गरिबांविषयी, मजुरांविषयी या सरकारला कोणतीही आत्मीयता नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. (छाया: पीटीआय)
-
राहुल गांधी यांच्या सुरक्षेत राज्यसरकारने कसूर ठेवल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राज्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी केला. (छाया: पीटीआय)
-
शेतकऱ्यांसाठी लढण्यास आम्ही सज्ज आहोत. त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केले. (छाया: पीटीआय)
-
शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील ही आपली पदयात्रा राजकीय कारणांसाठी नव्हे, तर तथ्य जाणून घेण्यासाठी होती, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. (छाया: पीटीआय)
-
राहुल गांधी गुरुवारी सकाळीच धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी या १२०० लोकवस्तीच्या गावात पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव काँग्रेस पक्षांच्या झेंडय़ांनी सजून गेले होते. (छाया पीटीआय)
-
या भागात आपण फिरलो, लोकांशी चर्चा केली तेव्हा शेतकऱ्यांचे तीन मुख्य प्रश्न असल्याचे आपल्या लक्षात आल्याचे राहुल म्हणाले. (छाया: पीटीआय)
-
सर्वात मोठा विषय कर्जाचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी. कर्जामुळेच सर्वाधिक आत्महत्या झाल्या असल्याचे ते म्हणाले. (छाया: पीटीआय)
-
संसदेत कृषिमंत्री महाराष्ट्रात केवळ तीनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, असे निवेदन देतात. इकडे शेकडो आत्महत्या होत असताना हरयाणाचे एक मंत्री शेतकऱ्यांना घाबरट संबोधतात. हा प्रकार संवेदनाशून्यतेचा आहे. सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून आपल्याला दु:ख होत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.(छाया: पीटीआय)

दुसरा विषय हा किमान आधारभूत किमतीचा आहे. पंजाबमध्येही याच संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. सरकार शेतमालाला योग्य भाव देत नाही आणि आधारभूत किंमत वाढवून मिळालेली नाही, ही समस्या आहे. महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळत होता, पण तो आता मिळत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. (छाया: पीटीआय) -
आपण शेतकऱ्यांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, मी आश्वासन काय देऊ शकतो, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. (छाया: पीटीआय)
-
काँग्रेस पक्ष म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करीतच आहोत, पण त्याला मर्यादा आहेत. (छाया: पीटीआय)
-
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची तयारी आम्ही केली आहे – राहुल गांधी (छाया: पीटीआय)
-
(छाया: पीटीआय)
-
कडक उन्हाने पदयात्रेत सहभागी झालेल्यांची परीक्षाच घेतली. (छाया: पीटीआय)
-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते मोहन प्रकाश, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, धामणगावचे आमदार वीरेंद्र जगताप, तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते पदयात्रेत सहभागी झाले होते. (छाया: पीटीआय)

विशेष संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कडे भेदून अनेक कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. (छाया: पीटीआय) -
राहुल गांधी यांची १३ किलोमीटरची पायदळवारी हा या परिसरात चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय झालेला होता. (छाया: पीटीआय)
-
चार किलोमीटर पायी चालून ते शहापूरला पोहोचले. या गावात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी त्यांनी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.(छाया: पीटीआय)
-
(छाया: पीटीआय)
-
(छाया: पीटीआय)
-
राहुल गांधी यानी आठ वर्षानी पुन्हा कलावती या शेतकरी महिलेची भेट घेतली. (छाया: पीटीआय)
-
कलावती यांनी राहुल गांधी यांच्या कामाची स्तुती केली. (छाया: पीटीआय)
-
शेतकऱ्यांनी धैर्य ठेवावे, खचून जाऊ नये. आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हेच सांगण्यासाठी आपण या भागात पदयात्रा केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. (छाया: पीटीआय)
-
धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथील आत्महत्या करणाऱ्या दोन शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबांशी संवाद साधला. (छाया: पीटीआय)
-
शेतकऱ्यांनी धैर्य ठेवावे, खचून जाऊ नये. आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हेच सांगण्यासाठी आपण या भागात पदयात्रा केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.(छाया: पीटीआय)
-
पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांचाच भरणा अधिक होता. राहुल गांधी यांच्या निकट पोहोचण्याच्या स्पध्रेत अनेक ठिकाणी प्रचंड रेटारेटी झाली. (छाया: पीटीआय)
-
रामगाव ते राजना हा १३ किलोमीटरचा प्रवास नंतर त्यांनी वाहनातून केला. (छाया: पीटीआय)
-
दुपारी ते रामगाव येथे पोहोचले आणि आत्महत्या करणाऱ्या एका शेतकऱ्यांच्या घरी ते गेले. या गावात पदयात्रेचा समारोप झाला. (छाया: पीटीआय)
-
आपण शेतकऱ्यांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, मी आश्वासन काय देऊ शकतो, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. काँग्रेस पक्ष म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करीतच आहोत, पण त्याला मर्यादा आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची तयारी आम्ही केली आहे. (छाया: पीटीआय)
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज