-
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते रविवारी ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ‘क्वीन’ चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना राणावत हिला ‘सवरेत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सवरेत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘कोर्ट’ या चित्रपटाला मिळाला. प्रादेशिक भाषांतील सवरेत्कृष्ट ठरलेल्या ‘किल्ला’ चित्रपटातील बालकलाकार पार्थ भालेराव याचाही यावेळी सन्मान करण्यात आला. ‘एलिझाबेथ एकादशी’ला सवरेत्कृष्ट बालचित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (छाया: पीटीआय)
-
भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, पत्नी साक्षी यांनी रविवारी त्यांच्या लहानग्या मुलीसह चेन्नईमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (छाया: पीटीआय)
-
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या पैकी एक असलेला हा धनेश पक्षी नमेरी राष्ट्रीय उद्यान, तेजपूर येथे रविवारी मोठ्या डौलात झाडाच्या फांदीवर बसलेला आढळला. (छाया: पीटीआय)
-
संस्कृती रेस्टारंट, मुंबईच्या आचाऱ्यांनी रविवारी महा-जिलेबी बनवली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याआधी २० किग्रॅ महा-जिलेबीच्या विक्रमाची नोंद होती. आधीचा विक्रम मोडत संस्कृतीच्या आचाऱ्यांनी ३७ किग्रॅची महा-महा-जिलेबी बनवून नवा विक्रम केला आहे.(छाया: पीटीआय)
Bihar Election Result 2025 Live Updates : आता जास्त जागा जिंकल्यावर भाजपा मुख्यमंत्रीपद मागणार? विनोद तावडे म्हणाले, “पुढे काय करायचं याचा निर्णय…”