-
अ पेईंग घोस्ट’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही गोडजोडी या सिनेमातून पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे. नुकतेच सिनेमाचे म्युझिक लॉंन्च मोठ्या धमाक्यात करण्यात आले.
-
या चित्रपटाचे म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते सिने इंडस्ट्रीतील मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आले.
-
आगळावेगळा आणि धमाल मस्ती असलेला ‘अ पेईंग घोस्ट ’ सिनेमा २९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
-
उमेश कामत आणि त्याची पत्नी प्रिया बापट कॅमे-यास पोज देताना.
-
उमेश कामत, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, श्रावणी पिल्लई, सनवी नाईक, समृद्धी साळवी, मॄणाल जाधव, सिद्धी कोळेकर, खुशबू कुलकर्णी, अतुल परचुरे, अनिता दाते, समिर चौघुले, उमा सरदेशमुख, उमेश दामले, श्रीरंग देशमुख, कांचन पगारे, भूषण तेलंग, पौर्णिमा अहिरे, गिरीश जोशी, मंगेश दिवाणजी, अजय टिल्लू, सिद्धेश्वर झाडबुके आणि महेश मांजरेकर यांच्या भूमिका या सिनेमात असणार आहेत.
-
सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘अ पेईंग घोस्ट’ या सिनेमाने प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढली आहे. एक वेगळीच कथा या सिनेमात रेखाटण्यात आली असून धमाल मस्ती या सिनेमात बघायला मिळणार आहे.
-
‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमाची कथा वसंत पुरूषोत्तम काळे यांची असून कथाविस्तार श्रावणी आणि सुश्रूत यांनी केला आहे. तर संवाद संजय मोने यांनी लिहिले आहेत.
-
‘अ पेईंग घोस्ट’ हा सिनेमा प्रसिद्ध लेखक वपू काळे यांच्या ‘बदली’ या कथेवर आधारीत आहे.
-
निर्माते जयंत लाडे हे सांगतात, “मला नेहमीच क्रिएटीव्ह इंडस्ट्रीचा भाग व्हायचे होते. त्यानुसार मी काही टेलिव्हिजनवरील मालिकांवर काम केले. वीरा, महादेव, नव्या ह्या त्यापैकीच काही मालिका आहेत. पण तीन वर्षानंतर मी श्रावणी आणि सुश्रूत यांच्या ‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमाची कथा वाचली आणि ह्या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
-
उमेश कामत
-
प्रसाद भेंडे आणि सुकन्या मोने
-
सुकन्या मोने
-
पुष्कार श्रोत्री
-
शर्वणी पिल्ले
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी