-
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात तडखेबाज शतक ठोकल्यानंतर ख्रिस गेलने फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अंदाजात सेलिब्रेशन केले.
-
ख्रिस गेल हा रोनाल्डोचा चाहता आहे. याचीच प्रचिती गेलने शतक ठोकल्यानंतर केलेल्या जल्लोषात पाहायला मिळाली.
-
अवकाळी पावसासह वादळ सध्या भारतातील अनेक शहरात घोंघावते आहे. मात्र बुधवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ख्रिस गेलरुपी वादळ अवतरलं.
-
गेलने आपल्या अद्भुत फटकेबाजीचा अव्वल नजराणा सादर करत शतकी खेळी साकारली.
-
जॉन्सनच्या गोलंदाजीवर चौकार लगावत गेलने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधले १४वे शतक पूर्ण केले.
-
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या चेंडूपासून केवळ आक्रमण धोरण स्वीकारलेल्या गेलने पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला.
-
जॉन्सनच्या पहिल्याच षटकात त्याने २० धावा वसूल केल्या. संदीप शर्माच्या दुसऱ्या षटकात त्याने २४ धावा लुटल्या.
-
अक्षर पटेलने स्वत:च्या गोलंदाजीवर शानदार झेल टिपत गेलचा झंझावात संपुष्टात आणला. त्याने ७ चौकार आणि १२ षटकारांची लयलूट केली ५७ चेंडूंमध्ये ११७ धावा फटकावल्या.
-
गेलवादळाच्या बळावर बंगळुरूने २२६ धावांचा डोंगर उभारला.
-
या खेळीदरम्यान बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर ट्वेन्टी-२० प्रकारात १५०० धावा करणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला.
-
गेलला विराट कोहलीने साजेशी साथ दिली.
-
गेलची फटकेबाजी सुरू असताना विराट कोहलीने ३२ तर ए बी डी’व्हिलियर्सने ४७ धावांची खेळी केली. बंगळुरूने पंजाबपुढे २२७ धावांचे आव्हान ठेवले.
-
ए बी डी’व्हिलियर्सचा अचंबित करणारा फटका.
-
ज्या खेळपट्टीवर गेलने गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवल्या, त्याच खेळपट्टीवर बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबचा ८८ धावांत खुर्दा उडवला.
-
डोंगराएवढय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने लुटुपूटूच्या लढतीप्रमाणे खेळ केला आणि त्यांचा डाव ८८ धावांतच संपुष्टात आला. बंगळुरूने १३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
-
विजयी आनंद.
Dharmendra Health Update: Video – धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी