• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. major fire breaks out in a building in mumbai 10 injured

फोटो: मुंबईत अग्नितांडव

काळबादेवी परिसरात एका जुन्या इमारतीला शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीच्या बचावकार्यादरम्यान अग्निशमनदलाचे दोन अधिकारी शहीद झाले असून, आगीमध्ये होरपळल्यामुळे दोन अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.

Updated: October 7, 2021 13:49 IST
Follow Us
  • काळबादेवी परिसरात एका जुन्या इमारतीला शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीच्या बचावकार्यादरम्यान अग्निशमनदलाचे दोन अधिकारी शहीद झाले(छाया- गणेश शिर्सेकर)
    1/15

    काळबादेवी परिसरात एका जुन्या इमारतीला शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीच्या बचावकार्यादरम्यान अग्निशमनदलाचे दोन अधिकारी शहीद झाले(छाया- गणेश शिर्सेकर)

  • 2/15

    अग्निशमन दलाचे संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन अधिकाऱी आगीमध्ये होरपळल्यामुळे मृत्युमुखी पडले. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 3/15

    आगीने रौद्ररूप धारण केल्याने इमारतीचा काही भाग कोसळला असून, त्या ढिगाऱ्याखाली अग्निशमन दलाचे दोन अधिकारी अडकले. जखमींपैकी एका अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 4/15

    सहा तासांनंतर रात्री उशिरा आग आटोक्यात आली. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 5/15

    आग विझविण्यासाठी सुरुवातीला अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा आणि आठ पाण्याचे टँकर रवाना झाले. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने इतर अग्निशमन केंद्रांवरील गाडय़ाही मागविण्यात आला. सहा तासांच्या प्रयत्नांनतर रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या १७ गाडय़ांनी आग आटोक्यात आणली. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 6/15

    आग विझवण्यासाठी आलेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर जखमी झाले असून, आग पसरत असतानाच इमारतीचा भाग कोसळू लागला. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 7/15

    काळबादेवीतील इमारतीमध्ये रहिवाशांची संख्या कमी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र वित्तहानी मोठय़ा प्रमाणावर झाल्याचा अंदाज आहे. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 8/15

    इमारतीत कपडय़ांची दुकाने असल्याने आग झपाटय़ाने पसरल्याचा अंदाज आहे. तिसऱ्या मजल्यावर एक कार्यालय असून, चौथ्या मजल्यावर काही सोनारांची दुकाने आणि दोन कुटुंब राहतात. यातील एक कुटुंब अजमेर येथे गेले असल्यामुळे त्यांचे घर बंद होते. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 9/15

    तर दुसऱ्या घरातील पोळ कुटुंबियांना शेजारच्या इमारतीतील सुबोध धुमाळ तरुणाने सुखरूप बाहेर काढले. आगीमुळे इमारतीचा पुढचा भाग पूर्ण कोसळला. इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 10/15

    वाहतुकीच्या अडथळय़ांमुळे गाडय़ा पोहचण्यास काहीसा वेळ लागला. पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरातील रस्ते चिंचोळे, त्यात रस्त्यांच्या दुतर्फा गाडय़ा उभ्या असतात. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 11/15

    इमारतीत राहणाऱ्या पोळ कुटुंबातील प्रियांका पोळ या मुलीचे १५ दिवसांनी लग्न आहे. मात्र या प्रसंगामुळे कुटुंबीय सुन्न झाले. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 12/15

    प्रियांका व तिचे वडील घरी आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान, या विभागाचे आमदार राज पुरोहित यांनी माढवकर कुटुंबियांची प्रभादेवी येथील म्हाडाच्या एका घरात व्यवस्था केली आहे,

  • 13/15

    उपमुख्य अग्निशमन अधिकारी आय. एस. अमीन हे गंभीर जखमी झाले. तर अतिरिक्त विभागीय अग्निशमन अधिकारी एस. जी. राणे तसेच महेंद्र देसाई हे ढिगाऱ्याखाली अडकले. यापैकी अमीन आणि देसाई यांना बाहेर काढण्यात आले. मात्र राणे यांना बाहेर काढण्यात रात्री उशिरापर्यंत यश आले नव्हते. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 14/15
  • अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार ४.२०च्या सुमारास आग लागल्याचे त्यांना समजले. यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या.

Web Title: Major fire breaks out in a building in mumbai 10 injured

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.