-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला आसूडगाव ते कळंबोली या दरम्यान चार ते पाच ठिकाणी गळती लागली आहे. या पाण्याच्या गळतीमुळे येथे तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच प्राधिकरणाने जलवाहिनीची ठिकठिकाणी गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र आसूडगाव येथील गळती रोखण्याचे काम एमजेपीचे अधिकारी विसरून गेले. त्यामुळे पुन्हा १३०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीतील पाणी रिकामे करावे लागणार त्यानंतरच ही गळती रोखता येईल. एमजेपीने यापूर्वीही आसूडगाव येथील गळती रोखली होती. मात्र २५ वर्षांपूर्वीच्या जीर्ण झालेल्या वाहिनीमुळे हे सातत्याने घडत आहे. दुरुस्तीचे काम हाती घेतल्यावर पुन्हा एकदा काही दिवसांची पाणीटंचाई पनवेलमधील नागरिक व सिडको वसाहतींना सहन करावी लागणार आहे. (छायाचित्र – नरेंद्र वास्कर)

इगतपुरी तालुक्यातील टंचाईने आजीपासून नातीपर्यंत सर्वाचीच परीक्षा घेण्याचे ठरविले असून पाण्यासाठी घरातील सर्वच सदस्य कामाला लागले आहेत. (छाया- मयूर बारगजे) 
जर्मन बनावटीच्या ऑडीने आरएस ७ ही १.४० कोटी रुपयांची कार मुंबईत सोमवारी ऑडी इंडियाचे प्रमुख जो किंग यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर केली. याच श्रेणीतील तिच्या आधीच्या कारपेक्षा आरएस ७ ही १२ लाख रुपयांनी महाग आहे. (छायाः प्रदीप दास) -
पटियाला येथे झालेल्या एका कार्यक्रमात गौहर खानची चाहती तिच्यासह सेल्फी काढताना. (छायाः पीटीआय)
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध