-
उष्म्याच्या कडाक्यापासून शरीराला काहीसा थंडावा मिळावा म्हणून नागरिकांकडून टरबुजांना असलेली मागणी लक्षात घेऊन नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव अशा मोटय़ा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर टरबूजची आवक झाली आहे. (छाया- मनेश मासोळे)
-
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने नृत्य अकादमी सुरू करण्याची घोषणा केली असून मुंबईतील एका कार्यक्रमात तिने याबाबतच्या एका अॅपचे अनावरण केले. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
देशाच्या आíथक राजधानीची शान आणि जागतिक वारसा यादीतही आपली एक स्वतंत्र ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला नवी झळाळी मिळाली आहे. एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात आíकटेक्ट सर जॉर्ज गिलबर्ट स्कॉट यांच्या कल्पनेतून खास गॉथिक शैलीत साकारलेल्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि ग्रंथालय या ऐतिहासिक वास्तूचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. यानंतर मंगळवारी या ऐतिहासिक मानोऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
मुंबईत सध्या उन्हाच्या प्रचंड झळा जाणवत असून नागरिक त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. (छाया- गणेश शिर्सेकर)

कर्नाटकमधील चिकमंगलूरजवळील काद्रिमिद्री गावात लांडोर उडतानाचे टिपलेले छायाचित्र. (छाया-पीटीआय) -
श्रीनगर येथे सीआरपीएफच्या जवानांनी पासिंग परेडच्यावेळी तिरंग्याचे फॉर्मेशन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया-पीटीआय)
-
मुंबईतील छत्रपती शिवाजीमहाराज वस्तू संग्रहालयातील नवीन वस्त्रोद्योग गॅलरी सुरू करण्यात आली आहे. एक परदेशी पर्यटक कुतुहलाने चरख्याचे छायाचित्र काढताना. (छाया – प्रशांत नाडकर)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..