-
गोकुळ हाऊस आग दुर्घटनेत जबर जखमी झालेले उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांची गेल्या सहा दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. (छाया- दीपक जोशी)
-
अमीन यांनी गुरुवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला.(छाया- दीपक जोशी)
-
भायखळा येथील अग्निशमन केंद्रासमोर अमीन यांना अखेरची मानवंदना देण्यात येऊन त्यांच्यावर चेंबूर येथील चरईतील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया- दीपक जोशी)
-
अमीन यांच्या पश्चात चार व सहा वर्षांचे दोन मुलगे व पत्नी असा परिवार आहे. (छाया- दीपक जोशी)
-
काळबादेवी येथील चार मजली इमारतीला गेल्या शनिवारी लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन, सहायक विभागीय अधिकारी संजय राणे आणि भायखळा अग्निशमन केंद्राचे प्रमुख महेंद्र देसाई आदी अधिकारी गेले होते. (छाया- दीपक जोशी)
-
इमारतीचा एकेक भाग कोसळत असल्याने अधिकाऱ्यांची सुटका करण्यात अडचणी येत होत्या. अखेरीस शर्थीच्या प्रयत्नांनंतर नेसरीकर व अमीन यांना ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकांना यश आले. मात्र या दुर्घटनेत नेसरीकर ४० टक्के, तर अमीन ८० टक्के भाजले होते. (छाया- दीपक जोशी)
-
निवारी मध्यरात्रीच या दोघांवरही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यानंतरही अमीन यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवत होता. (छाया- दीपक जोशी)
-
-
संजय राणे व महेंद्र देसाई या दोघांनाही या दुर्घटनेत जागीच वीरमरण आले. (छाया- दीपक जोशी)
-
बूर अग्निशमन वसाहतीत संयुक्त कुटुंबासह वास्तव्य करणारे अमीन हे त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रिय होते. अमीन यांच्या उपचारादरम्यान झालेला संपूर्ण खर्च महानगरपालिका करणार आहे. (छाया- दीपक जोशी)
Video : धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी