-
राहुल गांधी यांनी शुक्रवारी तेलंगणमध्ये १५ कि.मी.च्या पदयात्रेला सुरुवात केली असून आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गरिबांचा विसर पडला असून ते मिनी मोदी आहेत, अशी टीकाही गांधी यांनी केली. (छाया: पीटीआय)
-
पंतप्रधानांचा चीन दौऱ्याचा शुक्रवारी दुसरा दिवस होता. दिवसभरात पंतप्रधानांनी चिनी पंतप्रधानांशी दीड तास चर्चा केली. यात द्विपक्षीय मुद्दय़ांबरोबरच सीमावादाचाही समावेश होता. (छाया: पीटीआय)
-
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील येल्लापूर गावातील शेतकऱ्याने शुक्रवारी भात रोपांसाठी बियाणांची पेरणी केली. कमी जागेमध्ये ही पेरणी असल्यामुळे औताला बैल जुंपण्याची आवश्यकता भासत नाही. (छाया: पीटीआय)
-
गुरगाव, हरियाणामध्ये शुक्रवारी झालेल्या दोन गटांच्या भांडणात अनेक सर्वसामान्य भरडले गेले. आपल्या जखमी लहानग्याला वाचवणाच्या धडपडीत व्याकूळ झालेली ही माता. (छाया: पीटीआय)
Video : धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी