कधीही पडेल अशा अवस्थेतील धोकादायक घरात राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळ्यातील प्रत्येक रात्र काळरात्रीसमान वाटत असते. अपुरी जागा, घरांच्या वाढत्या किमती, घरमालक-भाडेकरू वाद, शासनाकडून वाढीव एफएसआय मिळण्याची आशा आदी विविध कारणांमुळे ठाणे, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आदी परिसरातील हजारो कुटुंबे अशा प्रकारचा धोका पत्करत असतात. (छाया- दीपक जोशी)
Updated:
1/9

ठाण्यातील इंदिरानगर तर डोंगरावर वसले आहे. मुंब्रा तसेच कळवा परिसरात पारसिक डोंगराच्या दोन्ही बाजूंवर झोपडय़ांनी अतिक्रमण केले आहे.
कल्याण, शहाड आणि उल्हासनगरमध्येही धोकादायक वस्त्या आहेत. (छाया- दीपक जोशी)
2/9
पावसाळ्यात इमारतीची अवस्था अधिक खराब होऊ नये म्हणून काही ठिकाणी प्लॅस्टिक अंथरलेले दिसते. (छाया- दीपक जोशी)
3/9

या विषयावर अनेक चर्चा, परिसंवाद झाले. मात्र अद्याप शासनाला धोकादायक इमारतींवर कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही. वर्षांनुवर्षे या
प्रश्नाचे भिजतघोंगडे कायम आहे. (छाया- दीपक जोशी)