भोसरीत सर्कशीतील हत्तीचा धुमाकूळ
- 1 / 8
भोसरीत सुरू असलेल्या ‘रॅम्बो सर्कशी’तील हत्तीला आंघोळीसाठी मोकळ्या मैदानात आणले असता, तो अचानक बिथरला. (छाया - राजेश स्टिफन)
- 2 / 8
हत्ती उडय़ा मारू लागला आणि इकडे-तिकडे सुसाट पळू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. (छाया - राजेश स्टिफन)
- 3 / 8
जवळपास साडेतीन ते चार तास हत्तीचा धुमाकूळ सुरू होता. (छाया - राजेश स्टिफन)
- 4 / 8
हत्ती बिथरल्याने रस्त्यावरील पथारीवाले, विक्रेते तसेच नागरिक पळापळ करू लागले. हत्ती मागे व नागरिक पुढे पळत असल्याचे चित्र दिसत होते. (छाया - राजेश स्टिफन)
- 5 / 8
हत्तीचा गोंधळ साडेतीन ते चार तास सुरू होता. सुदैवाने या सगळ्या गोंधळात कोणतीही हानी झाली नाही. (छाया - राजेश स्टिफन)
- 6 / 8
हत्ती मैदानातून रस्ता ओलांडून उड्डाणपुलाखाली असलेल्या जागेत गेला. हत्ती पिसाळला, अशी वार्ता गावभर पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली. (छाया - राजेश स्टिफन)
- 7 / 8
उड्डाणपुलावरून जाणारे वाहनस्वारही थांबून हा गोंधळ पाहात होते. (छाया - राजेश स्टिफन)
- 8 / 8
माहुतासह सर्कशीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने हत्ती नियंत्रणात आला आणि सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. (छाया - राजेश स्टिफन)