महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतीच लॉस एंजेल्सचा दौरा केला. त्यांनी चॅरिटी ट्रस्टसाठी आयोजित जय हो या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. हृदयविकार, ल्युकोमिया, लिम्फोमा अशा आजारांनी त्रस्त असलेल्या भारत आणि अमेरिकेतील रुग्णांसाठी हे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजीशियन ऑफ इंडियन ओरिजीन यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूडचे दिग्गज गायक सुखविंदर सिंग यांनी अमृता यांना साथ दिली.
