अमेरिका फक्त करोनाच्या लसीवर अवलंबून नाही, करुन ठेवलाय पुढचा विचार
- 1 / 15
संपूर्ण मानवजातीसमोर संकट निर्माण करणाऱ्या करोना व्हायरसला रोखणारी लस लवकरात लवकर निर्माण व्हावी, यासाठी अमेरिका पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. पण अमेरिका फक्त लस निर्मितीवर लक्ष देतेय असे नाही. अमेरिकेने त्यापुढचा सुद्धा विचार करुन ठेवला आहे. एएफपीने हे वृत्त दिले आहे.
- 2 / 15
अमेरिकेने करोनावरील लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीला १.६ अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली आहे ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत अमेरिकेकडून एखाद्या कंपनीला लस निर्मितीसाठी देण्यात येणारा आतापर्यंतचा हा सर्वाधिक निधी आहे. अमेरिकेने अन्य कंपन्यांना सुद्धा करोनावरील लस निर्मितीसाठी निधी दिला आहे.
- 3 / 15
करोना व्हायरसवरील उपचार व रोगप्रतिबंधाच्या संशोधनासाठी अमेरिका रिजेनीरॉन कंपनीला ४५ कोटी डॉलर्सचा निधी देणार आहे.
- 4 / 15
आरोग्य, मानवी सेवा तसेच संरक्षण विभागाबरोबर केलेल्या करारातील अटीनुसार नोव्हाव्हॅक्स वर्षअखेरपर्यंत १० कोटी लसीचे डोस उपलब्ध करणार आहे.
- 5 / 15
'ऑपरेशन वार्प स्पीडसोबत जोडले जाणे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे' असे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ स्टॅनली एर्क यांनी सांगितले.
- 6 / 15
लसीच्या अंतिम टप्प्याच्या फेज ३ ट्रायलला NVX-CoV2373 नाव देण्यात आले आहे.
- 7 / 15
SARS-CoV-2 मध्ये असलेला स्पाइक प्रोटीन बनवण्यासाठी मेरीलँड स्थित नोव्हाव्हॅक्स कंपनीने कीटकामधील पेशींचा वापर केला आहे. व्हायरससमधील हाच स्पाइक प्रोटीन मानवी पेशींवर आक्रमण करतो. मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी या कीटकांमधील पेशींचा वापर करण्यात आला आहे.
- 8 / 15
हेच तंत्रज्ञान वापरून आम्ही हिवाळयामध्ये मोसमी तापावर लस विकसित केली असून लसीची परिणामकारकताही सिद्ध केली आहे असे नोव्हाव्हॅक्सकडून सांगण्यात आले.
- 9 / 15
आता तीच टेक्निक वापरुन करोनावर लस बनवण्यात येत आहे.
- 10 / 15
अमेरिकेने लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्सला ऑक्सफर्ड विद्यापीठापेक्षा जास्त रक्कम दिली आहे. ऑक्सफर्डला १.२ अब्ज डॉलर दिले आहेत.
- 11 / 15
ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत अमेरिकेने २०२१ पर्यंत करोनावर प्रभावी ठरणाऱ्या कोटयावधी लस मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
- 12 / 15
COVID-19 अँटीबॉडी उपचारासाठी अमेरिका न्यूयॉर्कस्थित रिजेनीरॉन कंपनीला ४५ कोटी डॉलर्सचा निधी देणार आहे.
- 13 / 15
दोन अँटीबॉडीजनी मिळून REGN-COV2 हे औषध बनवण्यात आले आहे. हे औषध करोना व्हायरसमधील स्पाइक प्रोटीनला ब्लॉक करते. म्हणजे अमेरिका करोनाला रोखण्यासाठी फक्त लसीवर अवलंबून नाहीय. त्यांनी औषध निर्मितीवरही भर दिला आहे.
- 14 / 15
करोना व्हायरसवर प्रभावी लस बनवण्यासाठी जगभरात १०० पेक्षा जास्त प्रकल्प सुरु आहेत,
- 15 / 15
भारतानेही करोना व्हायरसवर दोन लस विकसित केल्या आहेत. या लसी सध्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.