…म्हणून रात्रीच्या अंधारात १६ हजार फूट उंचीवर DBO मध्ये ‘चिनुक’ हेलिकॉप्टरचं उड्डाण
- 1 / 10
लडाख सीमारेषेवर भारताने आपली सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्र तैनात केली आहेत. यामध्ये अपाची, चिनुक या अमेरिकन हेलिकॉप्टर्सचा सुद्धा समावेश आहे.
- 2 / 10
चिनुक हेलिकॉप्टरने दौलत बेग ओल्डीमध्ये रात्रीच्या अंधारात १६ हजार फूट उंचीवरुन उड्डाण केले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले.
- 3 / 10
काराकोरमच्या दक्षिणेला आणि चीप-चाप नदीच्या किनाऱ्याजवळ दौलत बेग ओल्डी येथे १६ हजार फूट उंचीवर भारताची शेवटची चौकी आहे.
- 4 / 10
डीबीओमध्ये नियंत्रण रेषेजवळील भागांमध्ये चीननेही मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती केली आहे.
- 5 / 10
परिस्थिती चिघळल्यास तात्काळ स्पेशल फोर्सेसच्या जवानांची तैनाती करता येईल का? तसेच सैन्य वाहने वाहून नेता येऊ शकतात? ती क्षमता तपासण्यासाठी रात्रीच्या अंधारात डीबीओ क्षेत्रात १६ हजार फूट उंचीवरुन चिनुक हेलिकॉप्टरने उड्डाण केले.
- 6 / 10
भारतीय लष्कराने आधीच या भागात T-90 रणगाडे, तोफा तैनात करुन ठेवल्या आहेत.
- 7 / 10
अफगाणिस्तानच्या डोगराळ भागात चिनुक हेलिकॉप्टरने रात्रीच्यावेळी उड्डाणाची आपली क्षमता सिद्ध केली आहे.
- 8 / 10
तात्काळ लष्करी प्रत्युत्तर देण्यासाठी जवान आणि तोफा वाहून नेण्यासाठी चिनुक हेलिकॉप्टर सर्वाधिक उपयुक्त आहे.
- 9 / 10
एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे ते सहज ओळखता येते. जमिनीवरुन होणाऱ्या गोळीबाराला उत्तर देण्यासाठी या हेलिकॉप्टरच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला मशिनगन आहे.
- 10 / 10
व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक आदी लष्करी कारवायांमध्ये चिनुकचा वापर करण्यात आला. अमेरिकेसह अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इराण, ग्रीस, इटली, जपान, स्पेन आदी देशांकडे चिनुक आहेत.