BMC तर्फे ३२० जणांवर होणार ऑक्सफर्ड लसीची चाचणी, इतक्या एमएलचा देणार पहिला डोस
- 1 / 10
करोना व्हायरस विरोधात ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीच्या मुंबई महापालिकेतर्फे केईएम आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये मानवी चाचण्या होणार आहेत.
- 2 / 10
ऑक्सफर्डने बनवलेल्या लसीच्या मानवी चाचणीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी अनेकांमध्ये मोठा उत्साह आहे.
- 3 / 10
या मानवी परीक्षणामध्ये सहभागी होता यावे, यासाठी अनेक जण स्वत:हून केईएम रुग्णालयात फोन करुन विचारणा करत होते. लसीच्या मानवी चाचणीत आम्ही सहभागी होऊ शकतो का? ही विचारणा करण्यासाठी केईएम रुग्णालयाचा फोन सतत खणखणत होता. (Photo: Reuters)
- 4 / 10
केईएम आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या ऑक्सफर्ड लसीच्या चाचणीला थोडा विलंब होत आहे. कारण दोन्ही रुग्णालयाच्या नीतीविषयक समितीने काही प्रश्न उपस्थित केले असून चाचणी संबंधी अजून माहिती मागितली आहे. (Photo: AP)
- 5 / 10
भारतात सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ही कंपनी ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन करणार आहे. त्यांनी कोव्हिशिल्ड असे या लसीला नाव दिले आहे. (Photo: Reuters)
- 6 / 10
मुंबई महापालिकेतर्फे मानवी चाचणीसाठी ३२० जणांना या लसीचे डोस दिले जाणार आहेत.
- 7 / 10
नीतीविषयक समितीने माहिती मागितली आहे. गणेशोत्सवामुळे सुट्टी असल्याने सोमवारच्याआधी ही माहिती मिळणार नाही. आवश्यक माहिती मिळाल्यानंतर समिती त्यावर चर्चा करेल असे नायर रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले.
- 8 / 10
"नीतीविषयक समितीच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर आम्हाला परवानगी मिळेल. भारतातील कुठल्याही केंद्रावर या लसीची अजून चाचणी सुरु झालेली नाही. सर्वचजण मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत" असे केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
- 9 / 10
"सर्व स्वयंसेवकांना सुरुवातीला ०.५ एमएलचा डोस दिला जाईल. साईड इफेक्ट म्हणजे एक-दोन दिवस सौम्य ताप येऊ शकतो" असे त्यांनी सांगितले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
- 10 / 10
प्रतीकात्मक छायाचित्र