रशियाचा धडाका! करोनावरील दुसऱ्या लशीला मान्यता; पुतिन म्हणाले, तिसरी लस येतेय….
- 1 / 10
रशियाने बुधवारी 'एपिवॅककरोना' या लशीला मान्यता दिल्याची घोषणा केली. 'एपिवॅककरोना' ही मान्यता देण्यात आलेली रशियातील दुसरी लस आहे. यापूर्वी 'स्पुटनिक व्ही' या लशीला मान्यता देण्यात आली होती. जगात करोना लशीला अधिकृतपणे मान्यता देणारा रशिया पहिला देश आहे.
- 2 / 10
संग्रहित छायाचित्र (Photo: Reuters)
- 3 / 10
सायबेरीयातील वेक्टर इन्स्टि्टयूटने एपिवॅककरोना लशीची निर्मिती केली आहे. मागच्या महिन्यात या लशीच्या सुरुवातीला टप्प्यातील मानवी चाचण्या पूर्ण झाल्या. या चाचण्यांचे रिपोर्ट अजून प्रसिद्ध झालेले नाहीत. या लशीची अजून तिसऱ्या फेजची चाचणी बाकी आहे. (Photo: AP)
- 4 / 10
ज्येष्ठ व्यक्तींमध्ये या लशीनंतर निर्माण होणाऱ्या प्रतिकार क्षमतेच्या चाचण्या घेण्यात आल्या. १८ ते ५५ वयोगटात ही लस चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करू शकते, या जुलैतील निष्कर्षांवर शिक्कामोर्तब झाले आहे. या लशीच्या चाचण्यांची माहिती लवकरच वैद्यकीय नियतकालिकात दिली जाणार असल्याचे ‘फायनान्शियल टाइम्स’ने म्हटले आहे. (Photo: Reuters)
- 5 / 10
नोव्होसीबर्स्कमध्ये १८ ते ६० वयोगटातील फक्त १०० स्वयंसेवकांवर एपिवॅककरोना लशीची चाचणी घेण्यात आली.
- 6 / 10
"नोव्होसीबर्स्क स्थित वेक्टर सेंटरने दुसऱ्या लशीची नोंदणी केली आहे. एपिवॅककरोना आणि स्पुटनिक व्ही मध्ये फरक आहे. स्पुटनिक व्ही अॅडीनोव्हायरसवर बनवलेली लस आहे तर एपिवॅककरोना पेपटाइडपासून बनवलेली लस आहे" असे रशियन सरकारकडून सांगण्यात आले. (Photo: Reuters)
- 7 / 10
अॅस्ट्राझेन्का कंपनीने या लशीच्या उत्पादन आणि पुरवठय़ासाठी अनेक देश व कंपन्यांशी करार केला असून, या लशीच्या अंतिम टप्प्यातील निष्कर्षांची सगळेच वाट पाहात आहेत. अमेरिकेत औषध नियंत्रकांच्या परवानगीने या लशीच्या प्रायोगिक चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- 8 / 10
एपिवॅककरोनाची ३० हजार स्वयंसेवकांवर चाचणी होईल. त्यात सायबेरीयातील ५ हजार लोकांवर चाचणी होईल.
- 9 / 10
ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले, की ही लस तयार झाली असे म्हणता येणार नाही, पण २०२१च्या सुरुवातीलाच ती सज्ज होईल. या वर्षी काही लोकांना ही लस मिळणार का, या प्रश्नावर ‘बीबीसी’ बोलताना ते म्हणाले, ‘‘ती शक्यता नाकारता येत नाही, पण सध्या तरी ती मुख्य अपेक्षा नाही. लसनिर्मितीचा कार्यक्रम प्रगतिपथावर आहे, पण पूर्ण झालेला नाही.’’
- 10 / 10
येत्या १९ ऑक्टोंबरपासून रशियात या तिसऱ्या लशीची चाचणी सुरु होईल. पहिल्या टप्प्यातील या चाचणीत ३०० स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.