“कॅल्क्युलेटर असताना पाढे का पाठ करायचे?”; मुलाच्या प्रश्नावर मुकेश अंबानींनी दिलं ‘हे’ उत्तर
- 1 / 8
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी व त्यांची पत्नी नीता अंबानी हे मुलांच्या संगोपनाबाबत अनेकदा चर्चेत असतात. आपण किती श्रीमंत आहोत याचा गर्व बाळगू नका, अशी शिकवण ते सतत त्यांच्या मुलांना देत असतात.
- 2 / 8
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश अंबानी म्हणाले होते, की मुलांमध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असली पाहिजे पण अभ्यासाच्या किमतीवर नाही. शिक्षण हा सर्वच गोष्टींचा पाया असल्याचं त्यांनी सांगितलं.
- 3 / 8
ते पुढे म्हणाले, "मी स्वत: कधी टॉपर नव्हतो पण माझी मूल्ये नेहमीच स्पष्ट होती असं मी माझ्या मुलांना नेहमीच सांगतो."
- 4 / 8
मुलगा आकाशने त्यांना एक प्रश्न विचारल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. "जर कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत तर आपण पाढे का पाठ करतो", असा प्रश्न आकाशने मुकेश अंबानी यांना विचारला होता.
- 5 / 8
या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "सर्वकाही आपल्या मेंदूत पक्कं बसलं पाहिजे म्हणून आपण पाठांतर करतो."
- 6 / 8
"माझ्या समजावण्याने आकाशवर इतका प्रभाव पडला की तो दररोज झोपण्यापूर्वी सर्व पाढे पाठ करून झोपू लागला होता," असं त्यांनी सांगितलं.
- 7 / 8
मुलांना शिक्षणाचं महत्त्व समजावं यासाठी मुकेश अंबानी व नीता अंबानी हे त्यांच्यासोबत अभ्यास करताना बसायचे.
- 8 / 8
छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया