करोना लशीचं स्टोअरेज मोठं आव्हान! अशी आहे भारताची तयारी
- 1 / 10
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी विकसित केलेल्या प्रायोगिक लशी चाचणीच्या निर्णायक टप्प्यावर आहेत. लवकरच या लशींना अंतिम मान्यता मिळू शकते. त्या दृष्टीने या लशींची खरेदी, साठवणूक आणि वितरण याची व्यवस्था करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. (Photo: AP)
- 2 / 10
लस उपलब्ध झाल्यानंतर विनाअडथळा आवश्यक ठिकाणी योग्यवेळेत पोहोचली पाहिजे, त्यासाठी सरकार तयारी करत आहे. (Photo: Reuters)
- 3 / 10
लस स्टोअर करुन ठेवण्यासाठी सरकारी आणि खासगी सुविधांची निवड करायला सुरुवात केली आहे. सरकारने शीतगृहांवर लक्ष केंद्रीत केले आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती ठराविक एका तापमानात ठेवावी लागणार आहे. त्यासाठी शीतगृह आवश्यक आहेत. लस ठराविक एका तापमानात स्टोअर केली नाही, तर ती निरुपयोगी होईल.
- 4 / 10
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली लशीच्या व्यवस्थापनासंदर्भात एक राष्ट्रीय तज्ज्ञांची समिती आहे. लशीचे जे अन्य पैलू आहेत, निर्मिती, खरेदी आणि वितरण यासाठी विविध उपगटही तयार करण्यात आले आहेत.
- 5 / 10
या उपगटाने सरकारच्या लशीकरणाच्या कार्यक्रमासाठी ज्या शीतगृहांचा वापर होतो, त्याच माहिती मिळवली आहे तसेच आणखी किती शीतगृहांची आवश्यकता आहे, त्याचा अंदाज बांधला आहे.
- 6 / 10
लस खरेदी केल्यापासून ती स्टोअर करणे, पोहोचवणे आणि वितरण या सगळया प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्कचा वापर करण्याची योजना आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
- 7 / 10
भारतात ७०० पेक्षा अधिक जिल्ह्यात लस स्टोअर करण्यासाठी २७ हजार केंद्रे आहेत. ही सर्व केंद्रे व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्कने जोडलेली आहेत.
- 8 / 10
"लस वितरणाचा विषय असेल तर चांगली मशिनरी आपल्याकडे उपलब्ध आहे. एक मजबूत राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. करोनाच्या लशीसाठी सुद्धा या मशीन्सचा उपयोग होऊ शकतो. पोलियो शिवाय गोवर आणि अन्य लशींना सुद्धा शीतगृहांची आवश्यकता लागते. ही समस्या येणार नाही" असे पॉल यांनी सांगितले.
- 9 / 10
लस खरेदी, साठवणूक आणि वितरण या लॉजिस्टिक्समध्ये समस्या येणार नाही. भारतामध्ये मोठया प्रमाणावर लशीकरणाचा कार्यक्रम चालतो, त्यामुळे भारताकडे लस व्यवस्थापन हाताळण्याची क्षमता आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.
- 10 / 10
लशीच्या प्रत्येक डोसची किंमत किती असावी, ते अजून निश्चित झालेले नाही. सध्या निर्मिती सुरु असलेल्या बहुतांश लशी या दोन डोसच्या आहेत. बाजारात लशीचे पर्याय बरेच उपलब्ध झाले, तर लशीच्या किंमती कमी होतील.