ऑक्सफर्डच्या लशीचे जे चार कोटी डोस बनवलेत, त्याचा पुरवठा भारतातच करणार ?
- 1 / 10
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोनावरील लशीचे आतापर्यंत चार कोटी डोस बनवले आहेत.
- 2 / 10
सिरम लवकरच नोव्हव्हॅक्सच्या लशीचे उत्पादन सुरु करणार आहे. भारतात अस्त्राझेनेकाच्या लशीची तिसऱ्या स्टेजची चाचणी करण्यासाठी १६०० स्वयंसेवकांची नोंदणी केल्याची माहिती सिरमने दिली. (Photo: Reuters)
- 3 / 10
नोव्हाव्हॅक्स लशीची मानवी चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळवण्याची सिरमची योजना आहे. (Photo: Reuters)
- 4 / 10
ऑक्सफर्डच्या लशीचे जे चार कोटी डोस बनवलेत, त्याचा पुरवठा भारतातच करणार ? यावर सिरम आणि आयसीएमआरच्या प्रतिनिधींनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (Photo: AP)
- 5 / 10
देशभरातील १५ केंद्रांवर सिरम आणि आयसीएमआर मिळून करोना लशीची चाचणी घेत आहे.
- 6 / 10
करोनाची लागण होणाऱ्या देशांमध्ये भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात ८० लाखापेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. १ लाख २० हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (Photo: Reuters)
- 7 / 10
सिरम शिवाय भारत बायोटेकची कोव्हॅक्सनी आणि झायडल कॅडिलाच्या स्वदेशी लशीच्या सुद्धा मानवी चाचण्या सुरु आहेत.
- 8 / 10
लवकरच डॉ. रेड्डी लॅब रशियाच्या़ 'स्पुटनिक व्ही' लशीची चाचणी सुरु करणार आहे.
- 9 / 10
या आठवडयाच्या सुरुवातील फायझर आणि बायोएनटेकने करोना विरोधात विकसित केलेली लस ९० टक्के परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केला होता.
- 10 / 10
रशियाने सुद्धा आपली लस ९२ टक्के परिणामकारक असल्याचे म्हटले आहे.