मुंबईत प्रथमच स्वदेशी लशीच्या चाचण्या
- 1 / 11
मुंबई : भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी निर्मितीच्या करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात करण्यात येणार आहेत.
- 2 / 11
यासाठीचा प्रस्ताव रुग्णालयाच्या एथिक्स समितीकडे पाठविला असून मंजुरी मिळाल्यानंतर चाचण्या सुरू होतील. मुंबईत या लशीच्या चाचण्या प्रथमच होत आहेत.
- 3 / 11
भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वदेशी निर्मित केलेल्या कोव्हॅक्सीन या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली आहे
- 4 / 11
(संग्रहित छायाचित्र)
- 5 / 11
मुंबईत या चाचण्या करण्यासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे.
- 6 / 11
एथिस्क समितीकडे प्रस्ताव सादर केला असून या आठवडय़ात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
- 7 / 11
त्यानंतर स्वयंसेवकांची नोंदणी सुरू होईल. लस टोचण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागेल.
- 8 / 11
सुरुवातीला ५०० ते एक हजार स्वयंसेवकांवर चाचण्या करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
- 9 / 11
मुंबईत सध्या ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविशील्ड’ या लशीच्या चाचण्या मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात सुरू आहेत.
- 10 / 11
या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- 11 / 11
लशीसाठीचे निकष : १८ ते ६० वर्षांमधील ज्यांना आतापर्यंत करोनाची बाधा झालेली नाही. इम्युनोसप्रेस औषधे घेत नाहीत आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे अन्य कोणतेही दीर्घ आजार नाहीत.