मुकेश अंबानींच्या घरी साफसफाई करणाऱ्या नोकराचा पगार माहित्ये का?
- 1 / 10
Mukesh Ambani Nita Ambani: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत जोडपं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला मुकेश अंबानी यांनी जी उंची गाठून दिली आहे, ते करून दाखवणं प्रत्येकालाच शक्य नाही.
- 2 / 10
मुकेश अंबानी यांच्या व्यापारकौशल्याची चर्चा संपूर्ण जगभरात कायमच होत असते. अंबानी परिवार आपल्या अवाढव्य साम्राज्यासाठी आणि श्रीमंतीसाठी तर ओळखला जातोच पण त्याचसोबत त्यांच्या उच्च दर्जाच्या लाइफस्टाइलचीही चर्चा असते.
- 3 / 10
मुकेश अंबानी यांनी अथक परिश्रम करून हे साम्राज्य उभारलं आहे. सध्या ते आपल्या २७ मजली अँटिलिया बंगल्यात राहतात. जाणून घेऊया मुकेश अंबानींच्या या बंगल्यात केर-वारा, साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला किती पगार मिळतो याबद्दल...
- 4 / 10
मुकेश आणि नीता अंबानी यांच्या लाइफस्टाइलबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतात. त्यांच्या अँटिलिया बंगल्यात काम करणाऱ्या नोकरांबद्दलही खूप चर्चा असतात.
- 5 / 10
लाइव्हमिरर डॉट कॉमच्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या घरात एकूण ६०० कर्मचारी काम करतात. त्यातील काही कर्मचारी २४ तास अँटिलियामध्येच हजर असतात.
- 6 / 10
२७ मजली अँटिलियामध्ये नोकर म्हणून काम मिळवणंदेखील सोपं नाही. विविध प्रकारच्या परिक्षा दिल्यानंतर योजनाबद्ध प्रक्रियेतूनच नोकरांची निवड करण्याची या घरातील पद्धत आहे.
- 7 / 10
एका मीडिया रिपोर्टनुसार, सुरूवातीच्या काळात मुकेश अंबानी यांच्या घरात काम करणाऱ्या नोकरांना ६ हजार रूपये महिना अशी सुरूवात दिली जात होती. त्यानंतर काम पाहून हा आकडा वाढवला जायचा, पण आता मात्र या आकड्यात भरपूर वाढ करण्यात आली आहे.
- 8 / 10
लाईव्हमिररने दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांच्या घरी काम करणाऱ्या नोकरदार वर्गाचा पगार हा सध्या लाखांच्या घरात आहे.
- 9 / 10
अशात अनेक मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीच्या आधारे सांगायचं झालं तर अँटिलियामध्ये केर-वारा, साफसफाई करण्यासाठी असलेल्या नोकराला तब्बल २ लाख रूपये प्रति महिना पगार दिला जातो. यात वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधांचाही समावेश असतो.
- 10 / 10
सर्व फोटो- सोशल मीडिया