-
धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून महाराष्ट्र सरकार आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर टीका होत आहे. यावर एनएआयच्या मुलाखतीत बोलताना उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी गौतम अदाणींना पाठिंबा दिला आणि ते म्हणाले की भारताला अशा संपत्ती निर्माण करणाऱ्यांची गरज आहे.
-
निरंजन हिरानंदानी पुढे म्हणाले की, “आपल्याला ४० अदाणी निर्माण करण्याची गरज आहे. आपल्याकडे फक्त एक अदाणी आणि एक अंबानी आहेत. जर ४० अदाणी-अंबानी निर्माण झाले तर आपला देश सुधारेल आणि त्यांच्यात अधिक स्पर्धा होईल. दोघेही चांगले व्यक्ती आहेत आणि चांगले काम करत आहेत.”
-
निरंजन हिरानंदानी यांच्या या विधानांनंतर ते चर्चेत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर निरंजन हिरानंदानी कोण आहेत, हे जाणून घेऊया.
-
१९५० मध्ये जन्मलेले निरंजन हिरानंदानी हे हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक आहेत. त्यांना रिअल इस्टेट उद्योगात असामान्य बांधकाम, व्यावसायिक गुणवत्ता, हुशारी आणि उत्कृष्टतेसाठी ओळखले जाते.
-
रिअल इस्टेटव्यतिरिक्त, हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे शिक्षण, फलोत्पादन, हॉस्पिटॅलिटी, मनोरंजन आणि रिटेल व्यवसायातही महत्त्वाचे स्थान आहे.
-
निरंजन हिरानंदानी यांचे शालेय शिक्षण मुंबईतील चॅम्पियन स्कूलमधून झाले आणि मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स पदवी प्राप्त केली. निरंजन हिरानंदानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून सीएचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
-
कांदिवलीतील चारकोप येथील विणकाम प्रकल्पातून त्यांनी कापड उद्योगात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर युनियन टेक्सटाइलकडून वेतनात १००% वाढ करण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केला. याबाबत निरंजन हिरानंदानी यांच्या संकेतस्थळावर उल्लेख आहे.
-
आपल्या संकेतस्थळावर निरंजन हिरानंदानी यांनी म्हटले आहे की, “जरी रिअल इस्टेटला त्या काळातील घाणेरडा उद्योग मानले जात होते आणि त्याच्याशी संबंधित लोक भ्रष्ट होते, त्यामुळे या क्षेत्रात येणे खरोखरच एक मोठे जोखीम होते, परंतु आम्ही आशा गमावली नाही. कठोर परिश्रम केले आणि आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, ऐंशीच्या दशकाच्या मध्यात वर्सोवा, अंधेरी येथे आमच्या कामाने बांधकाम क्षेत्रात ओळख मिळवली.”
-
निरंजन हिरानंदानी विविध सरकारी संस्था, खाजगी आणि सामाजिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. याशिवाय, ते १७ महाविद्यालये, दोन रुग्णालये, तीन मंदिरे इत्यादी चालवतात. (All Photos: @N_Hiranandani/X)
प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…