-
Vijay Diwas 2025 : पाकिस्तानचे दोन तुकडे करत १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती केल्याच्या आणि भारतीय लष्कराच्या गौरवशाली विजयाच्या निमित्ताने आजचा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. (Express photo by Partha Paul)
-
आजच्या दिवशी १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं. (Express photo by Partha Paul)
-
विजय दिवसाच्या निमित्ताने कोलकात्यात लष्करी पराक्रमाचं प्रदर्शन पाहायला मिळालं आहे. लष्करी पराक्रमाचं प्रदर्शन पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. (Express photo by Partha Paul)
-
विजय दिवस हा भारताच्या शौर्य, समर्पण आणि लष्करी पराक्रमाचं प्रतीक आहे. विजय दिवसाच्या निमित्ताने लष्कराच्या आश्चर्यकारक लष्करी प्रदर्शनाचे काही फोटो समोर आलेत. (Express photo by Partha Paul)
-
विजय दिनानिमित्त लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालयाने कोलकाता येथील आरटीसीटी ग्राउंड येथे एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये सैनिकांचं अद्भुत लष्करी प्रदर्शन दिसून आलं. (Express photo by Partha Paul)
-
या कार्यक्रमात लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टर शो, ते घोड्यांच्या शर्यतीपर्यंत नेत्रदीपक सादरीकरण करून १९७१ च्या योद्ध्यांना श्रद्धांजली वाहिली. (Express photo by Partha Paul)
-
या कार्यक्रमात रोबोटिक डॉग शो आणि मार्च पास्ट (संचलन करणे) सह नेत्रदीपक प्रदर्शने झाली. सैन्याच्या लढाऊ पराक्रमाचं, शौर्याचं दर्शन घडलं. (Express photo by Partha Paul)
-
भारतीय लष्कराच्या वैमानिकांनी एक शक्तिशाली युद्धाभ्यास दाखवण्याचा प्रयत्न यावेळी केला. (Express photo by Partha Paul)
-
या कार्यक्रमाची सुरुवात आर्मी कॉम्बॅट हेलिकॉप्टरच्या प्रभावी फ्लाय पास्टने झाली. यावेळी हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. (Express photo by Partha Paul)