-
भारताच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) ॲपलच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक सुरक्षा त्रुटी आढळल्यानंतर, ॲपल युजर्सना त्यांची उपकरणे तात्काळ अपडेट करण्याचा इशारा दिला आहे.
-
हा इशार आयफोन, आयपॅड, मॅक, ॲपल वॉच, ॲपल टीव्ही, व्हिजन प्रो आणि सफारी ब्राउझरसह ॲपलच्या विविध उत्पादनांना लागू होतो.
-
ॲपलच्या सूचनेनुसार (CIAD-2025-0054), ॲपल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत, ज्यांचा गैरफायदा सायबर हल्लेखोर घेऊ शकतात.
-
या त्रुटींमुळे हॅकिंग करणारे अनधिकृत कोड कार्यान्वित करू शकतात, उत्पादनावर नियंत्रण मिळवू शकतात, सुरक्षा निर्बंधांना बगल देऊ शकतात, संवेदनशील युजर डेटा मिळवू शकतात किंवा सिस्टम क्रॅश करू शकतात.
-
CERT-In ने या समस्येचे वर्गीकरण अति गंभीर असे केले आहे.
-
या सल्ल्यानुसार, हे सुरक्षा दोष नवीन अपडेट्सपूर्वी रिलीझ झालेल्या ॲपल सॉफ्टवेअर व्हर्जन्सवर परिणाम करतात. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
-
iOS आणि iPadOS व्हर्जन्स अनुक्रमे २६.२ आणि १८.७.३, macOS Tahoe व्हर्जन्स २६.२, macOS Sequoia व्हर्जन्स १५.७.३, macOS Sonoma व्हर्जन्स १४.८.३, tvOS व्हर्जन्स २६.२, watchOS व्हर्जन्स २६.२, visionOS व्हर्जन्स २६.२, Safari व्हर्जन्स २६.२.
-
जर तुमच्या डिव्हाइसमध्ये जुने व्हर्जन असेल, तर त्यांना धोक्यांना सामोरे जावे लागू शकते.
-
थोडक्यात, ॲपल डिव्हाइसेस अपडेट ठेवणे हे केवळ नवीन वैशिष्ट्यांपुरते मर्यादित नाही, तर वैयक्तिक डेटा, सिस्टमची अखंडता आणि डिजिटल सुरक्षा यांचे संरक्षण करण्यासाठी एक आवश्यक पाऊलल आहे. (All Photos: Reuters)
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय