-
हिवाळ्यात धुक्यामुळे वाहन चालवणं धोकादायक ठरू शकतं. कारण कमी दृश्यमानतेमुळे समोरच्या वाहनांचे इंडिकेटर्स दिसत नाहीत. त्यामुळे थोडासाही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. त्यामुळे ७ सुरक्षित ड्रायव्हिंग टिप्स जाणून घेऊयात. (Photo Source: Pexels)
-
कमी वेग ठेवा. : धुक्यात वेगानं गाडी चालवणं ही एक गंभीर चूक असू शकते. दृश्यमानता जितकी कमी असेल तितका तुमचा वेग कमी ठेवा. घाई करण्यापेक्षा सुरक्षितपणे पोहोचणं जास्त महत्त्वाचं आहे. (Photo Source: Unsplash)
-
फॉग लाइट्स योग्यरित्या वापरा : गाडी चालवताना फॉग लाइट्स किंवा हेडलाइट्स चालू ठेवा, यामुळे तुम्हाला रस्ता चांगल्या प्रकारे दिसेल आणि येणारे वाहनेही तुम्हाला दिसतील. (Photo Source: Unsplash)
-
कारच्या काचा स्वच्छ ठेवा : कारच्या काचा स्वच्छ आणि धुक्यापासून मुक्त असाव्यात. पुढे स्पष्ट दृश्य सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असल्यास वाइपर आणि डिफॉगर वापरा. (Photo Source: Unsplash)
-
रस्त्यावरील मार्किंग्सचा आधार घ्या : रस्त्यावरील पांढऱ्या किंवा पिवळ्या रेषा कमी दृश्यमानतेमध्ये खूप उपयुक्त ठरतात. तुमच्या लेनमध्ये राहण्यासाठी आणि वारंवार लेन बदलण्यापासून वाचण्यासाठी रस्त्यावरील मार्किंग्सचा आधार घेऊ शकता. (Photo Source: Unsplash)
-
सुरक्षित अंतर ठेवा : गाडी चालवताना समोरील वाहनापासून पुरेसं अंतर ठेवा. धुक्यात, अचानक ब्रेक लावल्याने पुढील गाडीचा अंदाज येत नाही, म्हणून अंतर राखणं अत्यंत महत्वाचं आहे. (Photo Source: Unsplash)
-
ओव्हरटेक करणं आणि वेगाने गाडी चालवणं टाळा : धुक्यात ओव्हरटे करणं घातक ठरू शकतं. त्यामुळे रस्ता दिसेल अशा वेगाने गाडी चालवा आणि गरज नसल्यास ओव्हरटेक करू नका. (Photo Source: Unsplash)
-
…तर सुरक्षित ठिकाणी थांबा : जर धुके दाट असतील आणि समोर स्पष्ट दिसत नसेल, तर पार्किंग किंवा रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी थांबा. तुमच्या गाडीचे इंडिकेटर्स चालू करा आणि धुके कमी होऊपर्यंत वाट पहा. (Photo Source: Unsplash)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा