-
वॉरेन एडवर्ड बफे हे एक दिग्गज अमेरिकन गुंतवणूकदार आहेत. ते बर्कशायर हॅथवे या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समूहाचे अध्यक्ष असून, आज वयाच्या ९५व्या वर्षी ते बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त होत आहेत. सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे बफे हे जागतिक स्तरावरील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांची एकूण संपत्ती १३ लाख कोटींपेक्षा जास्त आहे.
-
एकत्रितपणे, बफे यांचे शब्द ही एक आठवण करून देतात की, गुंतवणुकीत आणि इतर क्षेत्रांमध्येही, शाश्वत यश हे संयम, शिस्त आणि आयुष्यभर शिकण्याच्या वचनबद्धतेमध्ये रुजलेले असते. या पार्श्वभूमीवर वॉरेन बफे यांच्या गाजलेल्या वाक्यांचा आढावा घेऊया.
-
“पहिला नियम म्हणजे कधीही पैसे गमावू नका आणि दुसरा नियम म्हणजे पहिला नियम कधीही विसरू नका.”
-
“जर तुम्ही एखादा स्टॉक १० वर्षांसाठी स्वतःकडे ठेवायला तयार नसाल, तर तो १० मिनिटांसाठीही घेण्याचा विचार करू नका.”
-
“तुम्ही जे देता त्याला किंमत म्हणताता आणि तुम्हाला जे मिळते त्याला मूल्य म्हणतात.”
-
“इतिहासातून आपण हेच शिकतो की लोक इतिहासातून काहीच शिकत नाहीत.”
-
“पैसा सर्वस्व नाही, असे म्हणण्यापूर्वी तुम्ही भरपूर पैसा कमवाला आहे का हे एकदा पाहा.”
-
“पावसाचा अंदाज लावणे महत्त्वाचे नाही, तर नौका बांधणे महत्त्वाचे आहे.”
-
“आजच्या गुंतवणूकदाराला कालच्या वाढीचा फायदा होत नाही.” (All Photos: Reuters)
MPSC: ‘एमपीएससी’कडून ‘पीएसआय’च्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षात गोड बातमी मिळणार? मुख्यमंत्री सचिवालयाच्या कक्ष अधिकाऱ्याकडे फाईल…