-
आहाना गौतम या आयआयटी मुंबई आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीधर आहेत.
-
आहना यांनी आयआयटी मुंबईमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले आहे.
-
आहाना यांनी शिक्षणानंतर सुरक्षित कॉर्पोरेट नोकरीत न अडकता आपली स्वप्ने निवडली. अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी मोठ्या पगाराची नोकरी सोडली.
-
नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर आहाना यांनी ‘ओपन सिक्रेट’ या आरोग्यदायी स्नॅक्स ब्रँडची स्थापना केली, जो आता सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल मिळवतो.
-
राजस्थानमधील एका छोट्या शहरात जन्मलेल्या आहाना यांना या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
-
‘ओपन सिक्रेट’ची कल्पना त्यांना हार्वर्ड विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत असताना सुचली. त्यांना पारंपरिक भारतीय स्नॅक्स अधिक आरोग्यदायी बनवायचे होते.
-
सध्या आहाना गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. ‘ओपन सिक्रेट’ सुरू करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या वजनवाढीच्या वैयक्तिक अनुभवातून आणि आरोग्यदायी आहाराच्या महत्त्वाच्या जाणिवेतून मिळाली.
-
आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आहाना यांनी पी अँड जी, जनरल मिल्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले होते.
-
२०१९ मध्ये, आपल्या आईच्या खंबीर पाठिंब्याने त्यांनी ‘ओपन सिक्रेट’ची सुरुवात केली. आज त्यांचा प्रवास तरुण उद्योजकांना जोखीम पत्करून अर्थपूर्ण व्यवसाय उभारण्याची प्रेरणा देतो.
-
आईने दिलेल्या सुरुवातीच्या भांडवलाच्या मदतीने, अहाना यांनी २०१९ मध्ये ‘ओपन सिक्रेट’ची स्थापना केली. त्यावेळी आहाना ३० वर्षांच्या होत्या. (All Photos: Ahana Gautam/Instagram)
Donald Trump : ‘…तर २०० टक्के टॅरिफ लादणार’, डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्सला धमकी; म्हणाले, ‘मॅक्रॉन लवकरच पायउतार…’