-
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या निलगिरी टेकड्यांचा एक भाग असलेले, निलगिरी हे पश्चिम घाटातील एक महत्त्वाचे संवर्धन क्षेत्र आहे, जे जगातील जैवविविधतेच्या आकर्षण केंद्रांपैकी एक आहे. घनदाट जंगले, गवताळ प्रदेश आणि निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्ह सारख्या संरक्षित राखीव जागा असलेले हे क्षेत्र अनेक धोक्यात आलेल्या आणि असुरक्षित प्रजातींना आश्रय देते. निलगिरी पाहाताना तु्म्हाला येथे कोणते अद्भुत प्राणी दिसू शकतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
-
भारतीय गवा: इंडियन बायसन म्हणूनही ओळखले जाणारा, गवा हा जगातील सर्वात मोठा ‘wild bovine’ आहे आणि त्याला धोक्यात असलेला प्राणी म्हणून सूचीबद्ध करण्यात आलेले आहे. हे शक्तिशाली तरीही लाजाळू प्राणी बहुतेकदा नीलगिरीच्या जंगलात आणि गवताळ प्रदेशात चरताना दिसतात.
-
भारतीय पेंगोलिन: जगातील सर्वात जास्त तस्करी होणाऱ्या सस्तन प्राण्यांपैकी एक, भारतीय पेंगोलिन त्याच्या निशाचर आणि एकांत स्वभावामुळे क्वचितच आढळतो. संरक्षक खवल्यांमध्ये झाकलेला, हा कीटक खाण्याऱ्या प्राण्याला वन्यजीव तस्करांपासून वाचवण्याची आवश्यकता आहे.
-
लायन-टेल्ड मकाक (Lion-tailed Macaque) : त्याच्या चांदीच्या रंगाची पाढरी आयाळ आणि भावपूर्ण चेहऱ्यामुळे हा प्राणी सहज ओळखता येतो. हा प्राणी वर्षावनाच्या अच्छादनाखाली राहतो. जंगल कमी होत असल्याने हा प्राणी दुर्मिळ होत चालला आहे.
-
नीलगिरी लाफिंगथ्रश (Nilgiri Laughingthrush) : या पक्षाला नीलगिरी शोलाकिली असेही म्हणतात, हा धोक्यात आलेला पक्षी फक्त पश्चिम घाटातील शोला जंगलात आढळतो. त्याची मर्यादित व्याप्ती आणि अधिवासातील घट यामुळे नीलगिरीमध्ये त्याच्या अस्तित्वासाठी संवर्धनाचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतात.
-
नीलगिरी मार्टेन (Nilgiri Marten) : भारतातील एकमेव मार्टेन प्रजाती असणारे नीलगिरी मार्टेन हे सहज न दिसणारा मांसाहारी प्राणी आहे. हा प्राणी घनदाट सदाहरित जंगलांमध्ये राहते आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
-
नीलगिरी तहर (Nilgiri Tahr): नीलगिरी तहर हा एक धोक्यात आलेला पर्वतीय प्राणी आहे जो फक्त पश्चिम घाटाच्या उंच गवताळ प्रदेशात आढळतो. त्याच्या वक्र शिंगांमुळे आणि उभ्या कड्यांवरून सहज वावरण्याच्या उल्लेखनीय क्षमतेमुळे ओळखला जाणारा, हा प्राणी नीलगिरीच्या लँडस्केपमधील एक प्रमुख प्रजाती आहे.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…