-
फेसाळलेल्या कॉफीपासून ते कुरकुरीत स्नॅक मिक्सपर्यंत, अनेक ‘व्हायरल’ पाश्चात्य खाद्यपदार्थांच्या ट्रेंडची मुळे ही भारतीय स्वयंपाकघरांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. टिकटॉक आणि कॅफे संस्कृतीने जागतिक स्तरावर लोकप्रिय होण्याच्या खूप आधीपासून, भारतीय घरांमध्ये या पद्धतींवर प्रभुत्व मिळवले होते. आज आपण अशा सहा पाश्चात्य फूड हॅक्स घेणार आहोत ज्या प्रत्यक्षात भारतातील आहेत.
-
चाय Latte म्हणजेच मसाला चहा : कॅफेमधील आवडते ‘Chai Latte’ हा प्रकार मूलतः भारतीय मसाला चहाचे जास्त गोड, दुध घातलेले रूपांतर आहे, जो पारंपारिकपणे आले, वेलची, दालचिनी आणि दुधासह बनवला जाणारा मसालेदार चहा आहे.
-
लोणची : भाज्या, लिंबू आणि अगदी मिरच्यांचे लोणचे बनवण्याचे पाश्चात्य वेड भारताच्या प्राचीन ‘लोणच्याच्या’ परंपरेचे प्रतिबिंब आहे, तेल घातलेले आणि सूर्यप्रकाशात वाळवलेली लोणची मीठ आणि मसाले घालून टिकवून ठेवण्याची कला रेफ्रिजरेशनचे तंत्र येण्याच्या खूप आधीपासून आपल्याकडे वापरले जात आहे.
-
ट्रेल मिक्स आणि स्नॅक मिक्स कल्चर : ज्याला बरेच लोक ‘ट्रेल मिक्स’ म्हणतात ते भारतात चिवडा आणि नमकीनसारख्या मिश्रनांच्या रुपात आधूपासूनच आहे, ज्यामध्ये भाजलेले काजू, सुकामेवा, मसाले आणि कुरकुरीत घटक एकत्र करून खमंग स्नॅक तयार केले जाते.
-
हळदीचे लाट्टे (Turmeric Latte) ट्रेंड: वेलनेस कॅफेमध्ये लोकप्रियता मिळवणारा ‘गोल्डन मिल्क लाटे’ या प्रकाराचे मूळ हे भारतीय हळद घातलेल्या दूधामध्ये आढळते. हळद आणि काळी मिरी घातलेले कोमट दूध, हे पारंपारिकपणे रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर उपचारांसाठी वापरले जाते.
-
व्हीप्ड कॉफी ही भारतातील ‘फेंटी हुई कॉफी’ होती: जेव्हा व्हीप्ड कॉफी जगभरात व्हायरल झाली तेव्हा अनेकांनी त्याचे श्रेय कोरियन डाल्गोना कॉफीला दिले. परंतु भारतीय घरांमध्ये, ‘फेंटी हुई कॉफी’ (साखर घालून हाताने फेटलेली इन्स्टंट कॉफी) अनेक दशकांपासून बनवली जात आहे, ही कॉफी दूध घालण्यापूर्वी चमच्याने हलके आणि फेस येईपर्यंत जोरदारपणे फेटली जाते.
-
बाऊल मिल्स आणि थाळी संस्कृती: आधुनिक ग्रेन बाऊल्स आणि बुद्ध बाऊल हे बऱ्यापैकी थाळी पद्धतीचे प्रतिबिंब आहेत. धान्य, डाळी, भाज्या, दही आणि मसाले एकत्रित असलेले एक ‘बॅलेन्ड प्लॅटर’ हे तुम्हाला एकाच जेवणात सर्व पौष्टिक घटक मिळवून देते.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…