-
मोठ्या शहरात राहणाऱ्या अनेकांना एकच चिंता लागून राहिलेली असते ती म्हणजे त्यांच्या हाताशी काहीही बचत नसणे. त्यांचा पगार हा महिन्याच्या शेवटपर्यंत संपून जातो, आणि बचत करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच उरत नाही. कठीण काळासाठी बचत करणे अत्यंत आवश्यक असते, अशी बचत तुम्हाला संकटाच्या काळात मोठा आधार ठरू शकते. तसेच प्रत्येक वेळी क्रेडिट कार्डचे कर्ज किंवा बँक लोन घेण्याच्या फंदात पडणे स्वतःला संकटात ढकलण्यासारखे आहे. जर तुमचा पगार कमी असेल आणि तुम्हाला त्यातच बचत करायची असेल, तर खालील टिप्स नक्की फॉलो करा. (फोटो- pexels)
-
‘आधी बचत – नंतर खर्च’ ही ट्रिक वापरा – याचा अर्थ असा की, पगार झाल्यावर सर्वात आधी बचतीचे पैसे बाजूला काढा आणि उरलेल्या पैशात खर्च करा. जर तुमचा पगार २० हजार असेल आणि खर्च १५ हजार असेल, तरीही सुरुवातीलाच १ ते २ हजार रुपये बाजूला काढून ठेवण्याचा प्रयत्न करा. हे पैसे तुम्ही वेगळ्या खात्यात किंवा एका बॉक्समध्ये जमा करू शकता.(फोटो- pexels)
-
‘नो बाय चॅलेंज’ – प्रत्येक महिन्यात ठरवा की, अनावश्यक गोष्टींवर खर्च करून काहीही खरेदी करायचे नाही. अनेकदा आपण अशा गोष्टी विकत घेतो ज्यांची आपल्याला गरज नसते आणि नंतर तो खर्च केल्याचा पश्चात्ताप होतो. अनावश्यक खरेदी करण्यापासून स्वत:ला रोखण्याचे चॅलेंज द्या. (फोटो- pexels)
-
बजेट तयार करा – महिन्याच्या सुरुवातीलाच एक निश्चित बजेट तयार करा. बजेटमुळे खर्च करणे सोपे जाते आणि पैसेही वाचतात. एकदा बजेट ठरले की त्यानुसारच खर्च करा आणि पुढच्या महिन्यातही तेच फॉलो करा. (फोटो- pexels)
-
२४ तासांचा नियम – कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्यापूर्वी २४ तासांचा नियम पाळा. एखादी गोष्ट (उदा. फोन, हेडफोन, लॅपटॉप) घेण्यापूर्वी स्वतःला २४ तासांचा वेळ द्या आणि विचार करा की तुम्हाला खरोखरच त्याची गरज आहे का? यामुळे भावनेच्या भरात होणारा खर्च टाळता येतो. (फोटो- pexels)
-
सबस्क्रिप्शन बंद करा- आजकाल मोबाईलमध्ये अनेक ॲप्सचे सबस्क्रिप्शन असतात ज्याचे पैसे ‘ऑटो पे’ने आपोआप कट होतात. अनेकदा आपण ते वापरतही नाही. अशा सर्व सेवांचे ऑटो पे बंद करा. जे ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा फूड ॲप्स तुम्ही खरोखर वापरता, फक्त त्यांचेच सबस्क्रिप्शन ठेवा. (फोटो- pexels)
-
क्रेडिट कार्डचा वापर कमी करा – कमी पगार आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही क्रेडिट कार्डवर अवलंबून राहावे. ‘या महिन्यात शॉपिंग करू, पुढच्या महिन्यात पाहू’ हा विचार बजेट बिघडवतो. पुढच्या महिन्यात बिल भरताना तुमची बचत शून्य होते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर अत्यंत विचारपूर्वक करा. (फोटो- pexels)
-
डायरीत हिशोब ठेवा- डायरी किंवा मोबाईलच्या नोट्समध्ये आपली बॅलन्स शीट तयार ठेवा. खाणे, राहणे, कपडे आणि प्रवास यावर किती खर्च होतोय, याची नोंद ठेवा. यामुळे तुम्हाला कुठे उधळपट्टी होत आहे हे समजेल आणि तुम्ही ती रोखू शकाल. (फोटो- pexels)