-
प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने नुकतंच अनिल अंबानी यांच्या मुंबईतील घरावर मनी लाँडरिंग विरोधी कायद्याअंतर्गत जप्ती आणली आहे. (जनसत्ता)
-
अनिल अंबानी यांच्या मुंबईतील घराची किंमत ३ हजार ७१६ कोटींच्या जवळपास आहे. (Photo Source: @tinaambaniofficial/instagram)
-
अनिल अंबानी यांच्या १७ मजल्याच्या अलिशान घराचं नाव ‘Abode’ असं आहे. मुंबईतील प्रतिष्ठित निवासी क्षेत्रांपैकी एक असलेल्या पाली हिल परिसरात हे घर आहे. (Photo Source: Archidust)
-
अनिल अंबानींचं घर सुमारे ६६ मीटर उंच असलेल्या या इमारतीत १७ मजले आहेत. (Photo Source: @tinaambaniofficial/instagram)
-
अनिल अंबानींच्या ‘Abode’ या मुंबईतील आलिशान घरात अनेक प्रीमियम सुविधा आहेत. अनिल अंबानी हे मुंबईतील त्यांच्या अलिशान घरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. (Photo Source: Archidust)
-
अनिल अंबानींच्या मुंबईतील आलिशान घरावर हेलिपॅड असून हेलिकॉप्टर थेट छतावर उतरू शकतं. याशिवाय घरात स्विमिंग पूल, आधुनिक जिम आणि मोठी पार्किंग सुविधा आहे.(Photo Source: Archidust)
-
अनिल अंबानी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केल्यानंतर आता सीबीआयनेही अनिल अंबानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. (Photo Source: @tinaambaniofficial/instagram)
-
सीबीआयच्या निवेदनानुसार, शासकीय बँक व्यवहारांमध्ये तब्बल २ हजार २२० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाप्रकरणी अनिल अंबानी यांच्यावर रिलायन्स कम्युनिकेशन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Photo Source: Archidust)
-
मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडून सुरु असलेल्या कारवाईमुळे अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Photo Source: Archidust)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…