-
देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत आणखी एका सभागृहाची गरज भासली. त्यानुसार, २३ ऑगस्ट १९५४ रोजी राज्यसभेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे. हे कधीही विसर्जित होत नाही आणि येथील सदस्यांचा कार्यकाळ हा ६ वर्षांचा असतो.
-
राज्यसभेतील जागांची कमाल संख्या २५० असेल, असे संविधानात निश्चित केले आहे. यापैकी १२ सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. हे १२ सदस्य खेळ, कला, संगीत यांसारख्या क्षेत्रांतील असतात. तर उर्वरित २३८ राज्यसभा खासदार हे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून येतात.
-
संविधानाच्या चौथ्या अनुसूचीनुसार, कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात राज्यसभेच्या किती जागा असतील, हे त्या ठिकाणच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वाधिक असल्याने तिथे ३१ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात १९ जागा आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी १६-१६ जागा आहेत. दुसरीकडे गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम यांसारख्या राज्यांत केवळ एक-एक जागा आहे.
-
यानुसार राज्यसभेतील सदस्यांची एकूण संख्या २३३ पर्यंत पोहोचू शकते. अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंदीगड, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. सध्या राज्यसभेतील एकूण सदस्यांची संख्या २४५ आहे.
-
दर दोन वर्षांनी एक-तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होतो आणि त्या रिक्त जागांसाठी निवडणुका घेतल्या जातात. २०२० मध्ये ५५ जागांसाठी निवडणुका होणार होत्या. त्याआधी २०१८ मध्ये ५८ सदस्यांसाठी निवडणुका झाल्या होत्या.
-
राज्यसभा निवडणुकीत आमदार भाग घेतात. विधान परिषद सदस्य यात सहभागी होत नाहीत. राज्यसभा निवडणुकीचे मतदानाचे सूत्र ठरलेले आहे. राज्याच्या रिक्त असलेल्या राज्यसभा जागांमध्ये एक मिळवू त्या संख्येने एकूण विधानसभा जागांना भागले जाते. त्यानंतर जे उत्तर येते, त्यात पुन्हा एक मिळवला जातो.
-
समजा महाराष्ट्रात ७ जागा रिक्त आहेत आणि महाराष्ट्रात एकूण २८८ आमदार आहेत. तर पद्धत पुढीलप्रमाणे असेल- राज्यसभा जागांची संख्या ७ आहे. त्यात १ मिळवल्यास ८ होतात. आता या ८ ने आमदारांची संख्या (२८८) भागली जाईल. उत्तर ३६ येईल. आता त्यात पुन्हा १ मिळवला तर उत्तर ३७ येईल. म्हणजेच, सध्याच्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एक जागा जिंकण्यासाठी ३७ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. जर जागा कमी असतील, तर मतांची संख्या त्यानुसार वाढते.
-
आमदार सर्व जागांसाठी मतदान करत नाहीत. जर असे झाले, तर केवळ सत्ताधारी पक्षाचे उमेदवारच निवडून येतील. प्रत्येक आमदाराचे मत एकदाच मोजले जाते. त्यामुळे ते प्रत्येक जागेसाठी मतदान करू शकत नाहीत. अशा वेळी आमदारांना निवडणुकीदरम्यान पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागते. त्यांना सांगावे लागते की त्यांची पहिली पसंती कोणती आणि दुसरी कोणती. ज्याला पहिल्या पसंतीची मते जास्त मिळतील, तो विजयी मानला जातो.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…