-
केदारनाथ धामच्या यात्रेची वेळ जवळ येत आहे. दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात या यात्रेला सुरुवात होते. महादेवाचे दर्शन करण्यासाठी दरवर्षी लाखो भविक या मंदिराला भेट देतात. विशेष बाब म्हणजे हे मंदिर वर्षभर उघडे नसते, अतिवृष्टी आणि बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.
-
जर तुम्हीही यावर्षी केदारनाथ दर्शनानासाठी जाण्याचा विचार करत असाल, पण ट्रेकिंग करून जावे की हेलिकॉप्टरने? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत.
-
केदारनाथ मंदिराच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक ट्रेकिंग करत जातात. हा अनुभव अध्यात्मिक तर असतोच, याबरोबरच तो शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचा देखील असतो. पण पायी जाण्याचे फायदे आणि काही तोटे देखील आहेत.
-
जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ असाल, तर पायी प्रवास तुम्हाला अधिक आध्यात्मिक अनुभूती देतो. संपूर्ण रस्त्यावर हर हर महादेवचा जयघोष करत जाणारे भाविक तुमचे मन भक्ती आणि समाधानाने भरून टाकतात. हळूहळू मंदिरापर्यंत चालत जाण्याचा अनुभव तुम्ही विसरू शकणार नाहीत.
-
दुसरी बाब म्हणजे केदारनाथ मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता अत्यंत सुंदर आहे. वाटेत तुम्हाला बर्फाच्छादित डोंगर, नद्या आणि निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतात. हा अनुभव तुम्हाला हेलिकॉप्टरमध्ये मिळणार नाही. जर तुम्हाला चालणे शक्य नसेल, तर तुम्ही घोडा किंवा पालखीचा पर्यायही निवडू शकता.
-
हेलिकॉप्टर किंवा पालखीच्या तुलनेत पायी प्रवास स्वस्त पडतो. जे लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह जात आहेत, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
-
ज्यांना कमी वेळेत दर्शन घेऊन परत यायचे आहे त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरचा प्रवास सर्वोत्तम आहे. तसेच, जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्यांना शारीरिक कारणांमुळे ट्रेकिंग करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी हा प्रवास अतिशय सोयीस्कर आणि आरामदायी ठरतो.
Ashok Kharat case: खेड्यातला साधा मुलगा ते कोट्यवधींची माया जमवणाऱ्या अशोक खरातने श्रद्धेच्या नावाखाली महिलांना कसं जाळ्यात ओढलं? वाचा थरारक वास्तव