-
ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि विकसनशील अर्थव्यवस्था ओळखण्यात व त्यांमध्ये गुंतवणूक करण्यात अग्रेसर असलेले मार्क मोबियस यांचे बुधवार, १५ एप्रिल रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.
-
ऑगस्ट १७, १९३६ साली जन्मलेले मार्क मोबियस जगाच्या शेअर बाजारातील एक अवलिया प्रस्थ होते. ते जर्मन असले तरी त्यांचा जन्म अमेरिकेत झाला होता.
-
अमेरिकेत जन्म झालेल्या व्यक्तीस अमेरिकी नागरिकत्व मिळते. त्याचे प्रचंड फायदे असतात; परंतु या माणसाने अमेरिकी नागरिकत्व परत केले. जर्मन नागरिकत्व कायम ठेवले.
-
या माणसाचे वैशिष्ट्य एका वाक्यात सांगता येणार नाही. या माणसाने अनेक वर्षे शेअर बाजारात विकसित होत असलेले शेअर बाजार शोधले. या बाजारपेठेतल्या प्रत्येक कंपनीचा बारकाईने अभ्यास केला. वेगवेगळ्या शेअर बाजारांत आपले गुंतवणूक कौशल्य वापरून गुंतवणूकदारांचा प्रचंड फायदा करून दिला.
-
मार्क मोबियस यांच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षे १९८७ ते २०१५ त्यांनी टेम्पलटन म्युच्युअल फंडासाठी दिली. जॉन टेम्पलटनने त्यांना आपल्या म्युच्युअल फंडाचा प्रमुख गुंतवणूक व्यवस्थापक ही जबाबदारी दिली. या जबाबदारीचे अर्थातच त्यांनी सोने केले.
-
मार्क मोबियस यांनी बीए, एमएस कम्युनिकेशन हे शिक्षण घेतले, तर एमआयटीला अर्थशास्त्रातली डॉक्टरेट त्यांनी मिळवली.
-
या माणसाने प्रथम चीन, जपान, तैवान अशा देशांकडे लक्ष दिले. त्या देशाचा अभ्यास केला. अभ्यास करत असताना या विषयासंबंधी अनेक पुस्तके लिहिली.
-
इतर फंड मॅनेजर्सना आणि गुंतवणूकदारांना ते आपल्या पुस्तकांद्वारे मार्गदर्शन करतात आणि जगभर गुंतवणूक विषयावर व्याख्याने देतात. आयुष्य चांगले ठेवण्यासाठी फंड मॅनेजर्सना ते सांगतात, “जास्त ताण घेऊ नका.”
-
तर गुंतवणूकदारांना त्यांचे सांगणे हेच की, “झटपट पैसा, लाभ मिळविण्याच्या मागे लागू नका. बाजारात चढउतार होत असतात. या चढउतारांना सामोरे जा, बाजार समजून घ्यायचा असेल तर ज्या देशात गुंतवणूक करायची त्या देशातल्या छोट्यामोठ्या गावांत सायकलने फिरा.”
-
विविध अहवालांनुसार, २०२६ पर्यंत मार्क मोबियस यांची अंदाजित वैयक्तिक निव्वळ संपत्ती सुमारे ५० दशलक्ष डॉलर्स (४१५ कोटी रुपये) इतकी होती. ही आकडेवारी विश्वसनीय आर्थिक माहिती विश्लेषण संस्थांकडून प्राप्त झाली आहे. (All Photos: Mark Mobius/X)
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ