-
सध्याचा कडक उन्हाळा पाहता दुचाकीवरून सहकुटुंब घराबाहेर पडायचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. अशा वेळी बजेटमध्ये बसणारी कार तुमच्या कुटुंबाच्या आरामदायी प्रवासासाठी सर्वोत्तम ठरेल.
-
या लेखात तुमच्यासाठी आम्ही अशाच ५ बजेटफ्रेंडली कारची माहिती देणार आहोत. या कार रॉयल एनफिल्ड, जावा, ट्रायम्प अशा कंपनीच्या दुचाकींच्या किमतीत येतील.
-
मारुती सुझुकी एस-प्रेसो : कमी बजेटमध्ये ‘मायक्रो-एसयूव्ही’चा फील देणारी ही कार अवघ्या साडेतीन लाखांमध्ये येते. म्हणजे महागड्या दुचाकीच्या किमतीत दारासमोर गाडी उभी राहील. शहरात चालवण्यासाठी ही कार परफेक्ट आहे.
-
मारुती सुझुकी अल्टो : मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती असलेली अल्टो १० आपल्या जबरदस्त इंधन क्षमतेसाठी ओळखली जाते. कमी देखभाल खर्च आणि जास्त मायलेज यामुळे ही कार बजेट सेगमेंटमध्ये ‘किंग’ मानली जाते.
-
रेनो क्विड : जर तुम्हाला स्टायलिश डिझाइन आणि अधिक ग्राऊंड क्लिअरन्स असलेली कार हवी असेल, तर क्विड हा एक उत्तम पर्याय आहे. या कारचा लूक एसयूव्हीसारखा असून तिचे इंटेरिअरही आधुनिक फीचर्समुळे उठून दिसते.
-
मारुती सुझुकी सेलेरिओ : सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या पेट्रोल कारच्या यादीत सेलेरिओचे नाव आघाडीवर आहे. सिटी ट्रॅफिकमध्ये गाडीवर नियंत्रण ठेवणे अतिशय सोपे असल्यामुळे महिला आणि नवीन चालकांसाठी ही कार उत्तम आहे.
-
टाटा टियागो : ज्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चांगली कार हवी आहे, त्यांच्यासाठी टियागो हा एकमेव सक्षम पर्याय आहे. या कारची बिल्ड क्वालिटी मजबूत असून ती सेगमेंटमध्ये प्रिमियम फिल आणि सुरक्षित प्रवासाची खात्री देते.
-
या पाचही गाड्यांच्या बेस मॉडेल्सची किंमत ३.५० लाख ते ५ लाखांच्या दरम्यान आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या बचतीतून किंवा कमी हप्त्यावर आपली पहिली कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल.
-
हल्ली एअर कंडिशनिंग असलेल्या या कारमुळे लहान मुलांसोबत दुपारीही सुरक्षित प्रवास करता येतो. या उन्हाळ्यात दुचाकीच्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी या ‘व्हॅल्यू फॉर मनी’ कारचा विचार नक्की करा.
पहिल्यांदा सेक्स करताना रक्त येणं खरंच गरजेचं आहे का? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रत्येक महिलेला…”