-
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण ५०० रुपयांची एक नोट छापण्यासाठी रिझर्व्ह बँकेला साधारणतः २.२९ रुपये इतकाच खर्च येतो. नोटेची बाजारपेठेतील किंमत ५०० रुपये असली, तरी तिची निर्मिती किंमत अत्यंत कमी असते.
-
केवळ ५०० च नाही, तर २०० रुपयांच्या नोटेसाठी अंदाजे २.३७ रुपये आणि १०० रुपयांच्या नोटेसाठी १.७७ रुपये खर्च होतो. १० आणि २० रुपयांच्या नोटांची छपाई तर केवळ ९५ पैशांत पूर्ण होते.
-
भारतात नोटांची छपाई चार हाय-सिक्योरिटी प्रेसमध्ये केली जाते. नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि सालबोनी (पश्चिम बंगाल) येथे या अत्याधुनिक प्रेस आहेत.
-
नोटा छापण्याचा संपूर्ण अधिकार फक्त रिझर्व्ह बँकेकडे असतो. किती नोटा छापायच्या आणि त्यांची डिझाईन कशी असेल, याचा निर्णय आरबीआय घेते आणि केंद्र सरकार त्याला अंतिम मंजुरी देते.
-
प्रत्येक नोट बनवण्यासाठी विशेष प्रकारचा कागद आणि शाई वापरली जाते. यामध्ये अनेक गुप्त सुरक्षा फीचर्स जोडले जातात, जेणेकरून बनावट नोटा बनवणे अशक्य होईल.
-
नोटांची छपाई ही केवळ कागद छापण्याची प्रक्रिया नसून ती एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. यामध्ये वॉटरमार्क, सिक्युरिटी थ्रेड आणि रंग बदलणारी शाई यांसारख्या हाय-टेक गोष्टींचा समावेश असतो.
-
आरबीआयच्या ‘स्वच्छ नोट धोरणा’नुसार, जुन्या, फाटलेल्या किंवा मळलेल्या नोटा बँकांद्वारे परत घेतल्या जातात. या नोटा गोळा करून त्या रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली नष्ट केल्या जातात.
-
जुन्या नोटा नष्ट केल्यानंतर, अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा संतुलित राखण्यासाठी आरबीआय त्याच मूल्याच्या नवीन नोटा बाजारात आणते. यामुळे बाजारात नेहमी चांगल्या दर्जाच्या नोटा फिरत राहतात.
-
नोटांप्रमाणेच नाणी बनवण्यासाठी देशात मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा येथे सरकारी टाकसाळ आहेत. नाणी बनवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असते.
-
नोटांची छपाई आणि वितरण यावर आरबीआयची अत्यंत कडक नजर असते. प्रेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते नोटांच्या वाहतुकीपर्यंत प्रत्येक स्तरावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असते.
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO