-
सध्या देशभरात लगीनसराईचा हंगाम सुरू, असून सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने मध्यमवर्गीयांना सोन्याचे दागिने खरेदी करणे डोईजड होत आहेत. अशा परिस्थितीत ‘वन-ग्राम गोल्ड’ हा एक लोकप्रिय पर्याय म्हणून समोर आला आहे.
-
हे दागिने तांबे किंवा पितळ यांसारख्या धातूंपासून बनवलेले असतात, ज्यावर २४ कॅरेट सोन्याचा अत्यंत पातळ थर चढवलेला असतो; हे दागिने हुबेहूब खऱ्या सोन्यासारखे दिसतात पण किमतीत मात्र हजारो पटींनी स्वस्त असतात.
-
खऱ्या सोन्याच्या एका सेटसाठी लाखो रुपये मोजावे लागतात, मात्र इमिटेशन ज्वेलरीमध्ये ग्राहकांना कमी किमतीत जास्त व्हरायटी आणि नवनवीन ट्रेंडी डिझाइन्स उपलब्ध होत असल्याने खेड्यापासून शहरांपर्यंत अशाच दागिन्यांची गर्दी दिसते.
-
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति तोळा १,५२,००० रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला आहे, ज्यामुळे भारतात २०२५ मध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी सुमारे २४ टक्क्यांनी घटल्याचे ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने नमूद केले आहे.
-
भारतात प्रतिव्यक्ती उत्पन्न आणि सोन्याची किंमत यात मोठी तफावत निर्माण झाल्याने मध्यमवर्गीयांच्या लग्नाचे बजेट पूर्णपणे कोलमडले असून लोक आता दिखाव्यापेक्षा बचतीला प्राधान्य देत आहेत.
-
मुंबईच्या झवेरी बाजारासारख्या मोठ्या केंद्रांमध्ये आता १० पैकी ९ ग्राहक आर्टिफिशियल ज्वेलरीची मागणी करत आहेत किंवा जुन्या सोन्याचे दागिने मोडून त्यातून नवीन आणि हलक्या वजनाचे दागिने बनवून घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
-
बांगलादेशमध्ये भारतीय इमिटेशन ज्वेलरीला प्रचंड मागणी आहे, तर पाकिस्तानातील आर्थिक संकटामुळे लोक आता १८-कॅरेट किंवा केवळ गोल्ड-प्लेटेड दागिन्यांकडे वळले असून खऱ्या सोन्याचा वापर ‘रिस्की’ मानला जात आहे.
-
सोनं हे केवळ दागिना नसून ती एक गुंतवणूक मानली जाते, मात्र ज्या वेगाने किमती वाढत आहेत, ते पाहता आगामी काळात लग्नांमधील खऱ्या सोन्याची जागा पूर्णपणे आर्टिफिशियल ज्वेलरी घेईल की काय, अशी चिन्हे दिसत आहेत.
-
सोने महाग वाटत असले तरी सर्वकालीन उच्चांकापेक्षा अजूनही जवळपास २४ हजार रुपयांनी स्वस्त आहे. गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.
Marathi Compulsory Pratap Sarnaik Love Story: “ज्या मुलीला मदत केली तीच प्रेमात पडली”, गुजराती पत्नी, मराठी भाषा आणि राजकारणावर काय बोलले मंत्री प्रताप सरनाईक?