-
आता केवळ सिलिंडर बुक करून चालणार नाही. डिलिव्हरी बॉय घरी आल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी त्याला सांगावा लागेल, तरच सिलिंडर मिळेल.
-
ओटीपी पडताळणीमुळे चुकीच्या व्यक्तीला किंवा बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरच्या विक्रीला चाप बसेल.
-
शहरांमध्ये आता दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर ठेवावे लागेल (जे पूर्वी २१ दिवस होते).
-
ग्रामीण भागात दोन सिलिंडरमधील बुकिंगचे अंतर आता ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
-
जर तुम्ही ठराविक दिवसांच्या आधी गॅस बुक करण्याचा प्रयत्न केला, तर सिस्टम तुमची विनंती आपोआप नाकारेल.
-
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे १ मे रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी आधार आधारित ई-केवायसी आता अनिवार्य करण्यात आली आहे.
-
ज्या ग्राहकांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे अनुदान थांबू शकते.
-
तुमचे सर्व व्यवहार सुरळीत राहण्यासाठी तुमचा चालू मोबाईल नंबर गॅस एजन्सीकडे अपडेट असणे आता अनिवार्य आहे. ग्राहकांना आता ‘MyLPG’ पोर्टलवर जाऊन आपल्या पुढच्या बुकिंगची तारीख आणि स्टेटस स्वतः तपासावे लागणार आहे.
असा डिलिव्हरी बॉय मिळणं म्हणजे नशीबच! पार्सल द्यायला गेल्यावर दरवाजा दिसला उघडा, मालकीण येईपर्यंत काय घडलं बघाच; VIDEO पाहून कराल कौतुक