-
भारतीयांचे सोन्यावरील प्रेम जगजाहीर आहे, पण हेच सोने आता केवळ दागिन्यांच्या रूपात न राहता तुमच्यासाठी उत्पन्नाचे साधन बनणार आहे. आरबीआयने ‘गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम’ अधिक आकर्षक बनवण्यासाठी कंबर कसली आहे.
-
ही योजना म्हणजे सोन्याची एफडी करण्यासारखीच आहे, जिथे तुमचे सोने बँकेत सुरक्षित राहते आणि त्यावर तुम्हाला दरवर्षी व्याज मिळते. म्हणजे जिथे लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी पैसे मोजावे लागत होते, तिथे आता सोने ठेवण्यासाठी पैसे मिळणार आहे.
-
सध्या या योजनेवर २.५% व्याज मिळते, जे आता ४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आरबीआयने वर्तवली आहे. असे जर झाले तर मध्यमवर्गींसाठी ही योजना गेमचेंजर ठरणार आहे.
-
भारतीयांकडे सुमारे २० हजार टन सोने पडून असल्याचा आरबीआयचा अंदाज आहे. हे सोने बँकिंग यंत्रणेत आल्यास देशाची सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
-
गोल्ड लोन घेताना तुम्हाला व्याज भरावे लागते, पण या योजनेत तुमचे सोने सुरक्षित राहते आणि बँक तुम्हाला उलट पैसे (व्याज) देते. आता लोक केवळ दागिनेच नाही, तर सोन्याची नाणी आणि वेढणीमध्ये गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे ही योजना अधिक यशस्वी होऊ शकते.
-
पूर्वी लोक दागिने वितळवले जाईल या भीतीने ही योजना टाळायचे, पण आता नाणी आणि बारमध्ये गुंतवणूक वाढल्याने हा अडथळा दूर झाला आहे.
-
ही योजना १५ सप्टेंबर २०१५ रोजी सुरू झाली होती, पण आता ११ वर्षांनंतर त्यात मोठे बदल करून ती सर्वसामान्यांसाठी अधिक फायदेशीर बनवली जात आहे.
-
गुंतवणूकदार आपले सोने हवे तेव्हा परत घेऊ शकतात, ज्यामुळे ऐनवेळी पैशांची किंवा सोन्याची गरज भासल्यास अडचण येत नाही. केवळ २०२५ मध्येच भारतीयांनी ३०० टन सोन्याची नाणी आणि बार खरेदी केले होते, ज्याचा उपयोग या योजनेत होऊ शकतो.
-
कपाटात सोने ठेवल्याने त्याचे मूल्य बाजारभावानुसार वाढते, पण या योजनेत बाजारभावातील वाढीसोबतच बँकेकडून अतिरिक्त व्याजाचे पैसेही मिळतात.
७७ वर्षांचा वनवास संपला! जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा बीनागुंडा दौरा ऐतिहासिक का? जाणून घ्या