-
पेट्रोल-डिझेल कार आणि इलेक्स्ट्रिक वाहन यांच्यातील किमतीचा फरक आता कमी होत असून स्वस्तात चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. आम्ही तुमच्यासाठी यातील सर्वात स्वस्त ५ कारची माहिती घेऊन आलो आहोत.
-
‘व्हायवे मोबिलिटी इव्हा’ ही सध्या भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरली असून, याची किंमत अवघ्या ३.२५ लाखांपासून सुरू होते. ही एक २+१ सीटर कार असून, यामध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या छताचा पर्यायही उपलब्ध आहे.
-
आकर्षक डिझाइन आणि दमदार पर्फोमर्मन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या Morris Garages अर्थात एमजी कंपनीने आता ईव्ही क्षेत्रातही चांगले पर्याय आणले आहेत. त्यांची एमजी कॉमेट ईव्ही शहरात वापरण्यासाठी एक उत्तम ४-सीटर कॉम्पॅक्ट कार असून, तिची किंमत ४.९९ लाख ते ९.९९ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
-
पारंपारिक ५-सीटर हॅचबॅक शोधणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा कंपनीची टियागो ईव्ही हा लोकप्रिय पर्याय आहे, ज्याची किंमत ७.९९ लाखांपासून सुरू होते.
-
कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात टाटा पंच ईव्ही ६.४९ लाख ते १२.५९ लाख रुपये या किमतीत उपलब्ध आहे.
-
पीएमव्ही ईझ ई ही एक मायक्रो ईव्ही असून याची किंमत साधारण ४.७९ लाख रुपयांपासून सुरू होते.
-
अनेक कंपन्या आता ‘बॅटरी-एज-अ-सर्व्हिस’ मॉडेल वापरत आहेत, ज्यामुळे बॅटरी भाड्याने देऊन गाडीची सुरुवातीची किंमत लक्षणीयरीत्या कमी केली जाते.
-
कॉम्पॅक्ट सिटी ड्रायव्हिंगसाठी एमजी कॉमेट आघाडीवर असली, तरी पारंपारिक आसनव्यवस्था आणि चांगल्या रेंजसाठी टाटा टियागोला पसंती मिळत आहे.
-
लवकरच टाटा आणि एमजी कंपन्या १० लाख रुपयांच्या खाली आणखी नवीन मॉडेल लाँच करण्याची शक्यता असून यामुळे ग्राहकांसाठीचे पर्याय वाढतील.